स्थलांतर कसलं ? हिंदुना त्रास देणाऱ्यांचे ग्रहांतर करा !

बांगलादेशमध्ये हिंदुंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ २५ ऑगस्टला कडकडीत बंद, भिडे गुरुजींची माहिती

स्थलांतर कसलं ? हिंदुना त्रास देणाऱ्यांचे ग्रहांतर करा !

बांगलादेशमध्ये हिंदू धर्मियांवर होत असणारा अत्याचार तत्काळ थांबला पाहिजे, यासाठी सरकारने कडक धोरण अवलंबावे. तिथे होणाऱ्या अन्याय, अत्याचाराविरोधात  २५ ऑगस्ट रोजी सांगली जिल्हा कडकडीत बंद ठेवणार असल्याची माहिती श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक गुरुवर्य संभाजीराव भिडे (गुरुजी) यांनी आज सांगलीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. जे लोक हिंदूंना त्रास देत आहेत, त्यांचे आता ग्रहांतर करण्याची गरज असल्याचेही भिडे गुरुजी म्हणाले.

बांगलादेशमध्ये गेल्या काही दिवसांपासून हिंदू धर्मीयांची घरे, दुकाने पेटवून देण्यात येत आहेत. तेथे त्यांच्यावर अन्याय, अत्याचार होत आहेत. ते ताबडतोब थांबले पाहिजेत. तिथल्या हिंदूंचे स्थलांतर करावे, अशी आपली मागणी आहे का ? या प्रश्नावर भिडे गुरुजी म्हणाले, स्थलांतर नाही तर असे जे त्रास देणारे लोक आहेत त्यांचे ग्रहांतर करण्याची गरज आहे. घरावर दरोडा टाकायला आले म्हणून घर मालकाने घर सोडून पळून जायचे नसते तर दरोडेखोरांना मारायचे असते, असे ते म्हणाले. बांगलादेशमध्ये राहणारा हिंदू हा तिथेच पण अत्यंत सुरक्षित राहिला पाहिजे अशी आमची भूमिका आहे.

हेही वाचा..

मनोज जरांगेंच्या रॅलीत ५ लाख नव्हेत ८ हजार लोक !

चौधरी झुल्फिकार अली यांचा भाजपात प्रवेश !

‘सरकारकडून कारवाई हवी, निषेध नको!’

आम आदमी पार्टीच्या हरभजनसिंग यांनी ममतांना विचारला तिखट सवाल

भिडे गुरुजी म्हणाले, सुदैवाने आज हिंदुस्थानचे नेतृत्व हे नरेंद्र मोदी यांच्यासारख्या कडवट देशभक्ताच्या हातात आहे. त्यामुळे आपल्याला खात्री आहे की त्यांच्याकडून तशी पावले उचलली जातील. समजाची अशी अपेक्षा आहे की, देशाने या प्रकरणात घवघवीत पाऊल उचलले पाहिजे. आज दुर्दैवाने या विषयावर बोलायला कोण तयार नाही. वास्तविक देशातील सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आपले मतभेद विसरून या विषयावर एकत्र यायला पाहिजे, पण ते होताना दिसत नाही.
या जगात हिंदुस्थानचा एकही मित्र राष्ट्र नाही. लांडगे, बोके, कुत्रे कधी चांगले नसतात तसा हा प्रकार आहे.

बांगलादेशमध्ये हिंदुंवर सुरु असणारा अत्याचार हा तत्काळ थांबला पाहिजे यासाठी आम्ही बंदचे आंदोलन करत आहोत. २३ ऑगस्ट रोजी सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना याबद्दलचे सविस्तर निवेदन आम्ही मोटारसायकल वरून सर्व धारकरी एकत्र येऊन जाऊन देणार आहोत. राज्यात अन्य ठिकाणी सुद्धा अशा पद्धतीने कडकडीत बंद पाळला तर आनंदच होईल, असेही भिडे गुरुजी म्हणाले.

उद्धव ठाकरेंना जाऊन विचारा…

बांगलादेशमध्ये सुरु असणाऱ्या हिंदुंवरील अत्याचाराबद्द्ल उद्धव ठाकरे काही बोलले नाहीत या पत्रकारांच्या प्रश्नावर भिडे गुरुजी म्हणाले, तुम्हाला भाडे खर्च देतो, तुम्ही उद्धव ठाकरे यांना जाऊन याबद्दल विचारा, असे ते म्हाणाले.

Exit mobile version