‘महिलांसंबंधित गुन्ह्यांवर जलद निकालांची गरज’

कोलकाता बलात्कार-हत्येदरम्यान पंतप्रधान मोदींचे वक्तव्य

‘महिलांसंबंधित गुन्ह्यांवर जलद निकालांची गरज’

कोलकाता बलात्कार-हत्येप्रकरणी देशभर संताप व्यक्त होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोठे वक्तव्य केले आहे. महिलांच्या सुरक्षेची खात्री करण्यासाठी देशाला त्यांच्यावरील गुन्ह्यांच्या प्रकरणांमध्ये जलद निकालाची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. महिलांवरील अत्याचार आणि मुलांची सुरक्षा या समाजासाठी गंभीर चिंतेचा विषय असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी.वाय.चंद्रचूड यांच्यासह सर्वोच्च न्यायालयातील अनेक वरिष्ठ न्यायाधीश उपस्थित होते.

सर्वोच्च न्यायालयाला ७५ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त दिल्लीत एका कार्यक्रमाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी बोलत होते. यावेळी स्टॅम्प नाण्याचे अनावरण देखील करण्यात आले. सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज महिलांवरील अत्याचार, मुलांची सुरक्षा… ही समाजाची गंभीर चिंता आहे. सुरक्षेसाठी देशात अनेक कठोर कायदे करण्यात आले आहेत. परंतु आपल्याला ते अधिक सक्रिय करण्याची गरज आहे. महिलांवरील अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये जितक्या वेगाने निर्णय घेतले जातील, तितक्या निम्म्या लोकसंख्येला सुरक्षिततेची अधिक खात्री मिळेल,” असे पंतप्रधान मोदींनी नमूद केले.

ते पुढे म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयाची ७५ वर्षे, हा केवळ एका संस्थेचा प्रवास नाही. हा भारताच्या संविधानाचा आणि संवैधानिक मूल्यांचा प्रवास आहे. हा भारताचा लोकशाही म्हणून अधिक परिपक्व होण्याचा प्रवास असल्याचे पंतप्रधान मोदींनी म्हटले.

हे ही वाचा : 

केदारनाथमध्ये बिघडलेले हेलीकॉप्टर उचलून नेताना दोर तुटला आणि…

प. बंगालमध्ये पॉक्सोची ४८,६०० प्रकरणे प्रलंबित तरीही अतिरिक्त फास्ट ट्रॅक न्यायालये कार्यान्वित नाहीत

पावसाने झोडपल्यानंतर गुजरात किनारपट्टीला चक्रीवादळाचा इशारा

जितेश अंतापूरकर यांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश !

Exit mobile version