युपीए काळात टॅप केले गेले तब्बल ९,००० फोन

युपीए काळात टॅप केले गेले तब्बल ९,००० फोन

युपीए सरकारच्या काळामध्ये तब्बल ९,००० फोन्स आणि ५०० मेल्स टॅप केले गेले असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. माहिती अधिकारांतर्गत केलेल्या याचिकेतून ही माहिती मिळाली आहे. मोदी सरकारवर फोन टॅप केल्याचा आरोप होत असतानाच ही अतिशय संतापजनक माहिती कळली आहे.

प्रसनजित मोंडल यांनी केलेल्या माहिती याचिकेवर उत्तर देताना केंद्रीय गृहमंत्रालयाने दिलेल्या उत्तरात हा खुलासा केला होता. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून ६ ऑगस्ट २०१३ रोजी उत्तर देण्यात आले होते.

हे ही वाचा:

कुठे गेले अनिल देशमुख?

…हे तर मुंबईवर बेतलेल्या संकटाचे संकेत

भरदिवसा वकिलावर तलवारीने वार; दहिसरमध्ये कायदा सुवस्थेचे तीन तेरा!

आरोप बिनबुडाचे! भारतात कोणाचीही हेरगिरी नाही

या उत्तरामध्ये सांगण्यात आले होते की सुमारे ७,५०० ते ९,००० टेलिफोन आणि ३०० ते ५०० मेल अडवून टॅप करण्याचे आदेश देण्यात आले होते.

धक्कादायक गोष्ट म्हणजे सुमारे ९,००० फोन टॅप केले गेले होते. यामध्ये सामान्य नागरिकांसोबत काँग्रेसच्या जवळच्याच काही लोकांचा समावेश होता. अनेकांनी यावरून सरकारवर टीका देखील केली होती. विरोधी पक्षातील सिताराम येचुरी, जयललिता, सी बी नायडू, इत्यादी नेत्यांनी देखील याप्रकारची टीका केली होती. या प्रकारची टीका झाल्यानंतर त्यावरून संसदेमध्ये वादळी चर्चा झाली होती. त्यावेळी तत्कालिन अर्थमंत्री प्रणब मुखर्जी यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग हे सरकारच्या वतीने बाजू मांडतील असे सांगितले होते. मनमोहन सिंग यांनी एकत्रित संसदीय चौकशी समितीची मागणी फेटाळून लावली होती.

Exit mobile version