कालपासून भारतातल्या १८-४४ मधील सर्व नागरिकांच्या लसीकरणाला सुरूवात झाली. कालच्या पहिल्याच दिवशी संपूर्ण देशभरात ८५, ५९९ लोकांनी कोविडच्या लसीकरणाचा लाभ घेतला.
आत्तापर्यंत भारतात सुमारे १५ कोटी ६६ लाख ३७ हजार ८२५ नागरिकांना कोविशिल्ड ही लस देण्यात आली आहे. काल लसीकरणाचा १०६वा दिवस होता. कालच्या दिवसात देशभरात १६ लाख ४८ हजार १९२ नागरिकांना लस देण्यात आली.
हे ही वाचा:
भाजपाचे आवताडे महाविकास आघाडीवर भारी
फडणवीसांवरची आक्षेपार्ह टिप्पणी पडली महागात
रणाविन स्वातंत्र्य कोणा मिळाले?
आत्तापर्यंत ४५-६० वयोगटातील ५ कोटी ३२ लाख ८० हजार ७८२ नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. यापैकी ४० लाख ८ हजार ७८ लोकांनी दुसरा डोसही घेतला आहे. लसीकरणाचा लाभ सर्वात आधी ज्येष्ठ नागरिकांना मिळाला होता. ६० वर्षांवरील ५ कोटी २६ लाख १३ हजार ७०० नागरिकांनी पहिला डोस घेतला तर १ कोटी १४ लाख ४० हजार ५७७ नागरिकांना लसीचा दुसरा डोसही मिळाला आहे.
भारतात लसीकरण मोहिमेला १६ जानेवारी पासून प्रारंभ झाला. सुरूवातीला भारतीय लसीकरण मोहिमेची संपूर्ण मदार ही कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन लसींवर होती. मात्र देशातील वाढता कोविड लक्षात घेऊन केंद्र सरकारने वेळीच पाच परदेशी लसींना देखील मान्यता दिली. त्यापैकी रशियाच्या स्पुतनिक लसीची पहिली खेप भारतात दाखल झाली आहे. त्याशिवाय अधिकाधिक प्रमाणात लसीकरण व्हावे यासाठी सरकारने लसीकरणाचा परिघ १८ ते ४४ वयोगटापर्यंत वाढवला आहे.