उत्तर भारतात उष्म्याचा कहर; दिल्लीत तापमान ५० अंश सेल्सिअसजवळ!

राजस्थानच्या चुरूमध्ये पारा ५० अंश सेल्सिअसच्या पार

उत्तर भारतात उष्म्याचा कहर; दिल्लीत तापमान ५० अंश सेल्सिअसजवळ!

उत्तर भारतात सध्या उष्म्याने कहर केला आहे. राजस्थानच्या चुरूमध्ये पारा ५० अंश सेल्सिअसच्या पार गेला असून अन्य शहरांतही ४८ ते ४९ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. दिल्लीतही तापमान ५० अंश सेल्सियसवर पोहोचले आहे. उत्तर प्रदेशातील झासीमध्ये तापमान ४९ अंशावर होते तर आग्रा येथे ४८.६ व वाराणसीत ४७.६ होते. लखनऊच्या हवामान शास्त्र केंद्राचे वैज्ञानिक अतुल कुमार सिंह यांच्या मते उत्तर प्रदेशात या महिन्यात एवढे तापमान कधीही नव्हते.
डोंगराळ राज्यांतही वाढत्या उष्म्याने नागरिक हैराण झाले आहेत. जम्मू काश्मीरच्या जम्मू संभाग येथे पारा ४३ अंशावर पोहोचला होता. त्यामुळे येथे शाळांना सुट्ट्या द्याव्या लागल्या. तर, हिमाचलच्या ऊना येथे तापमान ४४ अंशावर पोहोचले होते.

जयपूरच्या हवामान विज्ञान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी देशातील सर्वाधिक तापमान चुरू देशात होते. येथे ५०.५ अंश तापमानाची नोंद झाली. हे या हंगामातील सर्वाधिक तापमान आहे. याआधी येथे १ जून २०१९ रोजी ५०.८ अंश तापमान नोंदले गेले होते. राजस्थान राज्य सरकारने आवश्यकता असेल तेव्हाच घरातून बाहेर पडण्याचे आवाहन केले आहे.
मंगळवारी दिल्लीतील तिन्ही केंद्रांमध्ये तापमान ४९ अंशावर पोहोचले होते.

हे ही वाचा:

राजकोट गेमिंग झोनमधील आगीत मालकाचाही मृत्यू!

‘पाकिस्तानने भारताशी केलेल्या १९९९च्या लाहोर कराराचे उल्लंघन केले’

पंजाबमध्ये ईडीची मोठी कारवाई, ड्रग्ज प्रकरणी १३ ठिकाणी छापे, ३ कोटी रुपये जप्त!

केजरीवाल २ जून रोजी पुन्हा तुरुंगात; सर्वोच्च न्यायालयाने दिला दणका!

मुंगेशपूर व नरेलामध्ये कमाल तापमान ४९.९ अंशावर पोहोचले होते. तर, नजफगडमध्ये ते ४९.८ अंशावर पोहोचले होते. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आणखी दोन दिवस असाच उष्मा कायम राहणार आहे. या दरम्यान तापमान ४६ अंश राहू शकते. तर, दिवसा उष्णतेची लाट येऊ शकते. दिवसा २५ ते ३५ किमी प्रति तास या हिशेबाने धुळीने भरलेले वारे वाहतील. ३० मे रोजी देखील अशीच परिस्थिती राहील. संध्याकाळी वातावरणात थोडा बदल होईल.

 

उत्तर प्रदेशातली उष्म्याने विक्रम मोडले
उत्तर प्रदेशात उष्म्याने सर्व विक्रम मोडले आहेत. झासीमध्ये पारा ४९ अंशावर पोहोचला, जे १३२ वर्षांतील वर्षांतील सर्वाधिक तापमान आहे. तर, आग्रा, हमीरपूर व प्रयागराजमध्ये पारा ४८.२, कानपूर व वाराणसीत ४७.६ व फतेहपूरमध्ये ४७.२ अंशावर पोहोचला.

या आठवड्यात पावसाची चिन्हे
हवामानशास्त्र विभागानुसार, उत्तर पश्चिम भारतात गुरुवारी पाऊस पडण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे तापमानात घट होईल.

Exit mobile version