लोकसभा निवडणूक संपून एक महिन्याहून अधिक काळ लोटला, मात्र इतके दिवस उलटूनही पराभूत खासदार बंगला सोडायला तयार नाहीत. मात्र, आता या या माजी खासदारांना सरकारी बंगला रिकामा करण्याच्या नोटीस बजावण्यात आल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, तब्बल २०० असे माजी खासदार आहेत ज्यांनी अजूनही सरकारी बंगला रिकामा केलेला नाही, या सर्व खासदारांना बंगला खाली करण्याच्या नोटीस बजावण्यात आल्या आहेत.
लोकसभेच्या २०० हून अधिक माजी सदस्यांना लुटियन्स दिल्लीतील त्यांना दिलेले सरकारी बंगले रिकामे करण्यासाठी नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या सूत्रांनी सोमवारी(१५ जुलै) ही माहिती दिली. माजी खासदारांना सार्वजनिक परिसर (अनधिकृत भोगवटादारांचे निष्कासन) कायद्यांतर्गत या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
हे ही वाचा:
३३ कोटी वृक्ष लागवड प्रकरणात माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना ‘क्लीन चीट’ !
कवी नारायण सुर्वेंच्या घरात केली चोरी पण, नंतर चोर चिठ्ठी लिहित म्हणाला सॉरी…
काँग्रेसचे हिरामण खोसकर नाना पटोलेंवर संतापले!
विकासशील इंसान पार्टीचे प्रमुख मुकेश साहनी यांच्या वडिलांची हत्या
नियमानुसार, माजी खासदारांना मागील लोकसभा विसर्जित झाल्यानंतर एक महिन्याच्या आत त्यांचे सरकारी बंगले रिकामे करावे लागतात. मात्र, अनेक खासदारांनी सरकारी बंगले रिकामे केलेले नाहीत. त्यामुळे त्यांना नोटीस बजावून बंगले रिकामे करण्यास सांगितले आहे. तसेच इतर माजी खासदारांना नोटिसा पाठवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.