कोरोनाच्या संसर्गामुळे आजपर्यंत महाराष्ट्रात तब्बल १५ हजार ७७९ मुले अनाथ झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
अशी अनेक मुले आहेत ज्यांचे दोन्ही पालक कोरोनामुळे मृत्युमुखी पडले आहेत. कोकण आणि पुण्यात अशा अनाथ मुलांची संख्या सर्वाधिक आहे. ज्यांनी आपले दोन्ही पालक गमावले त्यांची संख्या ४०९ इतकी आहे. त्यात २६७ मुलगे आणि २२३ मुली आहेत. यात सर्वाधिक १०६ मुले पुण्यातील आहेत तर कोकणातील १०४ मुलांचा समावेश आहे. नाशिक ९४, नागपूर ८६, औरंगाबाद ६२, अमरावती ३२ अशी विविध जिल्ह्यांची स्थिती आहे.
कोकण विभागात मुंबई २२, ठाणे ३६, रायगड १५, पालघर ११, सिंधुदुर्ग १३ आणि रत्नागिरी ७ मुले अनाथ झाली आहेत.
आता ही अनाथ मुले आपल्या अन्य नातेवाईकांकडे रहात आहेत. तेच त्यांची काळजी घेत आहेत.
हे ही वाचा:
भालाफेक, कुस्तीमध्ये भारतीय खेळाडूंचा बोलबाला
शिवसेनेने मदतीचे चेक परत घेऊन दाखवले
उपांत्य फेरीत लवलिनाचा पराभव तरीही ‘हे’ पदक केलं निश्चित
महाराष्ट्रात आतापर्यंत १ लाख ३२ हजार ९४८ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या बनारसला असलेल्या सुनील(१५) आणि नीलम (१०) यांना हेच दुःख सतावत आहे. त्यांचे वडील रमाकांत १३ एप्रिलला कोरोनामुळे मृत्युमुखी पडले आणि दोन दिवसांनी आई अंकिता निधन पावली. आपल्या आईवडिलांचा मृत्यू झाल्यामुळे दोघानाही प्रचंड मोठा धक्का बसला आहे. त्यातून सावरण्याचा ते प्रयत्न करत आहेत.
आता ही मुले मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. ज्या मुलांनी दोन्ही पालक गमावले आहेत त्यांना ५ लाखांची मदत केली जाणार आहे