डोंबिवली एमआयडीसी परिसरातील अमुदान कंपनीत झालेल्या स्फोटात ११ जणांचा मृत्यू झाला होता तर अनेक जण जखमी झाले होते.जखमींवर अजूनही उपचार सुरु आहेत.या घटनेला आज चार दिवस उलटून गेले आहेत.दरम्यान, मागील तीन दिवसांपासून याठिकाणी एनडीआरएफ पथकाचे सर्च ऑपरेशन सुरु होते.मात्र, पथकाने आता सर्च ऑपरेशन थांबवले आहे.परंतु, अमुदान कंपनीतील तीन कामगारांचा शोध अजूनही लागलेला नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाचे काम अजूनही सुरु आहे.घटनास्थळी धोकादायक अजूनही रसायने आहेत.त्यामुळे सावधानतेने पथकाचे काम सुरु आहे.गेल्या तीन दिवसांपासून एनडीआरएफ पथकाचे सर्च ऑपरेशन सुरु होते.मात्र ते आता थांबवण्यात आले आहे.मात्र, अजूनही तीन कामगारांचा शोध लागला नसल्याचे स्थानिकांनी संगितिले.
हे ही वाचा:
शिक्षिकेचा आवाज काढून सात विद्यार्थिनींवर बलात्कार
ईव्हीएमवर भाजपचा टॅग असल्याचा तृणमूलचा दावा फुसका!
भावेश भिंडेला २९ मे पर्यंत पोलीस कोठडी!
राजस्थानमध्ये उष्णतेचे ‘अर्धशतक’; फलोदीत ५० अंश तापमान
घटनास्थळावरून अमुदान कंपनीत काम करणाऱ्या कामगाराने माहिती दिली की, तीनजण अजूनही बेपत्ता आहेत.यामध्ये दोन हेल्पर आणि एका सिक्युरिटी गार्डचा समावेश आहे.त्या तिघांचा अजूनही पत्ता लागलेला नाही.मनोज जोंधळे असे सिक्युरिटी गार्डचे नाव आहे.तर भारत जैस्वाल आणि सिराजुद्दीन अहमद हे दोघे हेल्पर म्हणून काम करत होते.यांची अजूनही काही माहिती समोर आलेली नाही.हे तिघेही अमुदान कंपनीत काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.आम्हाला दोन-तीन मृतदेह दाखवले.मात्र, ते ओळखता येत नसल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.