25 C
Mumbai
Saturday, December 21, 2024
घरविशेषओदिशा अपघातातील पीडितांना वाचविण्यासाठी १४ तासांचा अथक संघर्ष

ओदिशा अपघातातील पीडितांना वाचविण्यासाठी १४ तासांचा अथक संघर्ष

गॅस कटर, बॅटरी, इलेक्ट्रिक कटरच वापर, एनडीआरएफ, लष्कराने केली मदत

Google News Follow

Related

ओदिशा येथे झालेल्या रेल्वे अपघातानंतर त्यात अडकलेल्या प्रवाशांना वाचविण्यासाठी रात्री प्रयत्नांची शर्थ करण्यात आली. डबे एकमेकांवर आदळल्यानंतर उलटसुलट झाले होते. त्यामुळे प्रवाशांना वाचविण्यासाठी अनेक अडथळे येत होते. गॅस कटर, बॅटरी, इलेक्ट्रिक कटर यांचा वापर करून प्रवाशांना वाचविण्यात किंवा मृतदेह काढण्यात आले.

एनडीआरएफ आणि लष्कराने या कामात प्रचंड मेहनत घेतली. सोबत एम १७ हेलिकॉप्टरची मदतही घेण्यात आली. त्यामुळे अनेक जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करणे शक्य झाले.

या अपघातात आतापर्यंत २६० पेक्षा अधिक लोक मृत्युमुखी पडल्याचे समोर येते आहे. तर जवळपास ९०० लोक जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाने यात प्रचंड मदत केली. ओदिशा राज्याच्या आपत्ती निवारण दलाने तसेच लष्करानेही यात मदतीचा हात दिला. अग्निशमन दले तसेत स्थानिक पोलिसांनीही या संदर्भात मदत केली. युद्धपातळीवर ही सगळी मदत केली गेल्यामुळे अनेकांचे प्राण वाचविण्यात यश आले आणि जखमींना तातडीने रुग्णालयात किंवा स्थानिक वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आली.

बचावकार्यात सहभागी झालेल्यांनी गॅस कटरचा वापर करून रेल्वेचे पत्रे कापले आणि डब्यात प्रवेश करून अनेकांचे प्राण वाचवले. जेव्हा हा अपघात घडला तेव्हा जवळपास १७ ते १८ डबे रुळावरून घसरले आणि एकमेकांवर आदळले, उलटेपालटे झाले. त्यातील प्रवाशांच्या आरोळ्या, किंचाळण्याचे आवाज येऊ लागले. तेव्हा स्थानिकांनी मदतीचा हात दिला आणि अनेकांना वाचविले. त्यानंतर मदतीसाठी विविध ठिकाणी धाव घेण्यात आली. मोठ्या क्रेनही मागविण्यात आल्या, बुलडोझर आणून त्याचाही उपयोग केला गेला. काही डबे हे एकमेकांवर चढलेले असल्यामुळे ते बाजुला करून त्याखाली दबलेल्यांना वाचविण्यासाठी निकराचे प्रयत्न केले गेले.

हे ही वाचा:

बृजभूषणविरोधातील दोन एफआयआर आणि तक्रारीत गंभीर आरोप

ओडिशा रेल्वे अपघातात आतापर्यंत २६१ जणांचा मृत्यू

केरळ स्टोरीबद्दलची नसिरुद्दीन यांची भूमिका खेदजनक

हुश्श!! पाच वर्षे झाली, आता लोअर परळ पुलाची एक मार्गिका खुली

कुत्र्यांचा वापरही जखमींना, प्रवाशांना शोधण्यासाठी केला गेला. एनडीआरएफच्या ९ टीम, ओदिशा आपत्ती निवारण दलाच्या ५ टीम, २४ अग्निशमन गाड्या, स्थानिक पोलिस, स्वयंसेवक यांनी अथक मेहनत घेऊन पीडितांना वाचविले, मृतदेह बाहेर काढले, लोकांना रुग्णालयात दाखल केले, अशी माहिती ओदिशाचे मुख्य सचिव प्रदीप जेना यांनी दिली.

जवळपास १४ तास हे बचावकार्य सुरू होते. आता हे बचावकार्य संपुष्टात आले आहे. आता या मार्गावरील अडथळे दूर करून पुन्हा एकदा तिथून रेल्वे धावू शकतील यादृष्टीने प्रयत्न सुरू झाले आहेत, अशी माहिती रेल्वेचे प्रवक्ते अमिताभ शर्मा यांनी दिली.

या अपघातात बेंगळुरू हावरा सुपरफास्ट एक्स्प्रेस, शालिमार-चेन्नई कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडी यांच्यात हा अपघात झाला. संध्याकाळी ७.२० च्या सुमारास ही घटना घडली. या घटनेचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. याची चौकशी करून त्यासंदर्भातील अहवाल तयार केल्यावर ही माहिती समोर येऊ शकेल.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा