देशातील जनतेने विकासाला मतदान केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यादा पंतप्रधान होत आहेत, त्यामुळे त्यांचे अभिनंदन करतो, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. इंडिया आघाडीने फक्त मोदी हटाव या मोदी द्वेषाने प्रचार केला परन्तु लोकांनी विकासाला मतदान केले, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
हेही वाचा..
मंडीच्या गादीवर ‘क्विन’च! कंगना रनौतकडून काँग्रेसच्या विक्रमादित्य सिंह यांचा परभव
नरेश म्हस्के ठरले जायंट किलर, ठाण्यात राजन विचारेंना पाडले
नागपुरात नितीन गडकरींनी विजयाचा झेंडा रोवला!
कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे विजयी, ठाकरेंच्या वैशाली दरेकरांचं खातं बुडीत!
ते म्हणाले, महाराष्ट्रात आम्ही संविधान बदलण्याच्या विरोधकांनी जो अपप्रचार केला, त्याबद्दल गैरसमज दूर करण्यात आम्ही कमी पडलो. यापुढच्या काळात त्यात आम्ही जरूर दुरुस्ती करू. ज्यांनी वोट बँकेचे राजकारण केले ते राजकारण कायम टिकत नाही. काही जागा आमच्या कमी मताने हरल्या गेल्या. काही ठिकाणी आम्ही उमेदवारी देण्यात उशीर केला कदाचित ते कारण पण असू शकेल. त्या सर्व बाबींची आम्ही कारणमीमांसा करू. काही त्रुटी राहिल्या त्या दूर करू.
एनडीएच्या बाजूने जनतेने कौल दिला आहे. इंडिया आघाडीला बहुमत दिलेले नाही. त्यामुळे नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान होणार आहेत. शिवसेना एनडीएचा घटक पक्ष आहे, त्यामुळे आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करतो, असेही ते म्हणाले.
ठाण्यात शिवसेनेचे नरेश म्हस्के विजयी झाले. म्हस्के एक सामान्य कार्यकर्ते आहेत. ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. तो गड शिवसेनेने राखला आहे. महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.