पंतप्रधान मोदींनी रविवारी (२० ऑक्टोबर) उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे आरजे शंकर नेत्र रुग्णालयाचे उद्घाटन केले. या सोहळ्याला उपस्थित असणारे कांची कामकोटी पीठाचे जगद्गुरू श्री शंकर विजयेंद्र सरस्वती स्वामीगल यांनी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाची प्रशंसा केली. ते म्हणाले, पंतप्रधान मोदींसारखा चांगला नेता आपल्यामध्ये आहे, हा देवाचा आशीर्वाद आहे आणि देव पंतप्रधान मोदींच्या माध्यमातून अनेक महान काम करत आहे.
शंकराचार्यांच्या पुढे म्हणाले, आपला देश खूप प्रगती करत आहे आणि या प्रगतीमागे एक महत्त्वाचा घटक म्हणजे मजबूत नेतृत्व. शंकराचार्यांनी ‘एनडीए’ सरकारच्या कारभाराचे संक्षिप्त रूप तयार केले आणि त्याला ‘नरेंद्र दामोदरदासांचे अनुशासन’ असे संबोधले. शासनाचे एक असे मॉडेल जे नागरिकांची सुरक्षा, सुविधा आणि कल्याण यावर लक्ष केंद्रित करते.
पंतप्रधान मोदींना सामान्य माणसाची आव्हाने समजतात, त्यामुळे ते दूर करण्यासाठी पंतप्रधान मोदी काम करतात. एनडीए सरकार हे जगभरातील शासनाचे मॉडेल आहे, ज्याचे इतर देशही अनुकरण करू शकतात, असे शंकर विजयेंद्र सरस्वती स्वामीगल म्हणाले.
हे ही वाचा :
नवी मुंबई विमानतळाच्या परिसरातील टेकडीवर उभा राहिला ‘अनधिकृत भव्य दर्गा’
भागलपूरच्या प्रसिद्ध शिवशक्ती मंदिरात तोडफोड, हिंदू समाजाकडून निदर्शने!
मुंबई विमानतळावर २ किलो सोने जप्त!
सोमवारी पिंपरीत होणार ब्राह्मण सामर्थ्य संमेलन
दरम्यान, वाराणसी स्पोर्ट्स स्टेडियमचे उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सपा आणि काँग्रेससह विरोधी पक्षांवर जोरदार निशाणा साधला. तसेच काशी येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सात विमानतळांशी संबंधित ६१०० कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचा शुभारंभ केला.