अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्यावर विश्वास व्यक्त केला. लोकांना स्थैर्य आणि प्रशासनात निश्चितता हवी असल्याचे त्या म्हणाल्या.
इंडिया टुडे टीव्हीला दिलेल्या एका खास मुलाखतीत सीतारामन म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गेल्या १० वर्षांतील कारकीर्द पाहून देशातील जनतेने भाजपला निवडून देण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी हे निश्चित आहे. लोकांचे इरादे स्पष्ट आहेत. मतदानासाठी महिला आणि तरुणाच्या रांगा बघायला मिळाल्या. महिलांनी आपल्याल विविध योजनांचा लाभ मिळाल्याचे स्पष्ट केले.
हेही वाचा..
पुण्यासारखीच जळगावात घटना, अपघातात चार जणांचा मृत्यू, आरोपी मोकाट!
निफ्टी २३ हजार जवळ, सेन्सेक्सची १ हजार अंकांनी उसळी!
डोंबिवलीच्या एमआयडीसीतील केमिकल कंपनीत भीषण स्फोट; परिसरातील इमारतीच्या काचा फुटल्या
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भिंडेवर १०० वेळा कारवाई
भाजप सरकार क्रॉनी कॅपिटलिझममध्ये गुंतल्याबद्दल राहुल गांधींनी केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना सीतारामन म्हणाल्या, त्यांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी “अत्यंत डाव्या” युक्तिवादाचा आधार घेतला. क्रोनी कॅपिटलिझमबद्दल कोण बोलत आहे? काँग्रेस? राहुल गांधींची खिल्ली उडवताना सीतारामन म्हणाल्या की, ते हातात कोणताही पुरावा नसताना बोलण्यात माहीर आहेत. राहुल गांधी २०१४-१५ पासून हा खेळ करत आहेत. त्यांना सर्वोच्च न्यायालयात जाऊन माफी मागावी लागल्याची आठवण त्यांनी करून दिली.
आदिवासींसाठी केलेल्या विकासकामांबद्दल बोलताना सीतारामन म्हणाल्या, खनिज कायदा २०१५ चा भाग बनलेल्या जिल्हा खनिज निधीने ज्या जिल्ह्यांमध्ये आदिवासी राहतात आणि संपत्ती समृद्ध आहे अशा जिल्ह्यांना पैसे परत दिले आहेत. या जिल्ह्यांना त्यांचा थकीत निधी मिळत आहे. आदिवासी भागाच्या विकासासाठी हे सर्व आता होत आहे.
सीतारामन यांनी काँग्रेस आणि इंडी आघाडीवर तुष्टीकरणाच्या राजकारणाचा आरोप केला. जेव्हा तुम्हाला धर्माच्या आधारावर संसाधने द्यायची आहेत, ते ध्रुवीकरण नाही का? राहुल गांधी म्हणतात की ते एक्स रे करतील आणि लोकांकडे असलेल्या संसाधनांचा हिशोब केला जाईल आणि त्यांचे पुनर्वितरण होईल. घटनेत याची परवानगी आहे का?, अशी विचारणा त्यांनी केली.
ज्यांचा पक्ष इंडी आघाडीचा आहे, असे लालू यादव म्हणतात, मुस्लिमांसाठी आरक्षण असले पाहिजे. हे सर्व काँग्रेसची वैचारिक बांधिलकी – व्होट बँकेचे तुष्टीकरण या फाऊंटहेडमधून बाहेर पडत आहे. हे जातीयवादी नाही का? असा सवाल त्यांनी केला.