भाजपमधून राष्ट्रवादीची पायरी चढलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे गेल्या आठ दिवसांपासून नॉट रिचेबल असल्याचे बोलले जातेय. खडसे यांचे दोन्हीही फोन बंद असल्याचे समोर आलेय. खडसे आता राष्ट्रवादीतही नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे नाथाभाऊ गेले कुठे? असा प्रश्न पडलाय. त्यांच्या अचानक नॉट रिचेबल होण्यामुळे राजकीय चर्चांना ऊत आला आहे. ते आता राष्ट्रवादीतही अस्वस्थ असल्याच्या चर्चा आहेत.
हे ही वाचा:
पदयात्रेत राहुल गांधींच्या गळ्यात एकाने घातले हात
शिवसेनेत फूट नाहीच; सिब्बल यांचा दावा तर जेठमलानी म्हणाले, पक्षातून बाहेर पडणे बेकायदेशीर कसे?
सामनाच्या संपादकपदी रामसे ब्रदर्स?
पाकिस्तानात १३ वर्षांच्या हिंदू मुलींना पळवून होत आहेत विवाह, धर्मांतरण
एकनाथ खडसे मुक्ताईनगरचे आमदार आहेत. भाजपमध्ये असताना त्यांनी महसूल मंत्री व कृषीमंत्री म्हणून काम केले. २०१६ मध्ये भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर एकनाथ खडसे यांना मंत्रिपदावरून पाय उतार व्हावे लागले. २०२० रोजी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर या पक्षातही त्यांना फार मोठी संधी मिळाली नाही. त्यामुळे या पक्षातही ते नाराज असल्याचे बोलले जातेय.
एकनाथ खडसे हे मुंबईत असल्याचे सांगण्यात येत असून त्यांची तब्येत खराब असून आराम करत असल्याचे समोर येत आहे. पहिल्यांदाच नॉट रिचेबल झाल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना ऊत आला आहे.