23 C
Mumbai
Sunday, December 29, 2024
घरविशेषदिल्ली निवडणुकीसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाची पहिली यादी जाहीर

दिल्ली निवडणुकीसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाची पहिली यादी जाहीर

यादीमध्ये ११ उमेदवारांची नावे 

Google News Follow

Related

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपले उमेदवार उभे केले आहेत. अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीकडून निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत ११ उमेदवारांची नावे आहेत.

राष्ट्रवादीने बुरारी, बदली, मंगोलपुरी, चांदनी चौक, बल्ली मारन, छतरपूर, संगम विहार, ओखला, लक्ष्मी नगर, सीमा पुरी आणि गोकुळ पुरी येथील उमेदवारांची घोषणा केली आहे.

उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे :
१. रतन त्यागी (बुरारी)
२. मुलायम सिंह (बदली)
३. खेम चंद (मंगलोपुरी)
४. खलिदुर रहमान (चांदनी चौक)
५. मोहम्मद हारून (बल्लीमारन)
६. नरेंद्र तन्वर (छतरपूर)
७. कमर अहमद (संगम विहार)
८. इम्रान सैफी (ओखला)
९. नमाहा (लक्ष्मीनगर)
१०. राजेश लोहिया (सीमापुरी)
११. जगदीश भगत (गोकुळपुरी)

हे ही वाचा : 

अभिनेत्री उर्मिला कोठारेंच्या कारने दोघांना उडवले, एकाचा मृत्यू 

आपची महिला योजना : चौकशीचे निर्देश

फ्लॉवर नही फायर है नितीश रेड्डी!

महाराष्ट्रात अवैध घुसखोरीविरोधात कारवाई सुरू, १६ बांगलादेशींना अटक!

दरम्यान, अलीकडेच राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले होते की, दिल्लीमध्ये आमच्या पक्षाने यापूर्वी निवडणुका लढविल्या आहेत, यावेळीही निवडणूक लढवणार आहे. आघाडीसाठी एनडीएशीही चर्चा केली जाईल, असेही ते म्हणाले होते. मात्र, राष्ट्रवादीने ज्या प्रकारे उमेदवारांची नावे जाहीर केली, त्यावरून भाजपसोबत युती करून निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट झाल्याचे दिसत आहे.

दिल्लीत एकूण ७० विधानसभा जागांसाठी निवडणुका होणार आहेत. आम आदमी पार्टीने सर्व ७० विधानसभा जागांसाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. तर काँग्रेसने आतापर्यंत आपल्या दोन उमेदवारांच्या यादीत ४७ उमेदवारांची घोषणा केली आहे, तर उर्वरित उमेदवारांची घोषणा होणे बाकी आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा