एनसीईआरटीच्या पुस्तकात आता ‘हडप्पा संस्कृती’चा उल्लेख ‘सिंधू सरस्वती संस्कृती’

एनसीईआरटीकडून सहावीच्या सामाजिक शास्त्राच्या नव्या पाठ्यपुस्तकात महत्त्वाचे बदल

एनसीईआरटीच्या पुस्तकात आता ‘हडप्पा संस्कृती’चा उल्लेख ‘सिंधू सरस्वती संस्कृती’

नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग म्हणजेच एनसीईआरटीने सहावीच्या सामाजिक शास्त्राच्या नव्या पाठ्यपुस्तकात काही महत्त्वाचे बदल केले आहेत. या पुस्तकातील काही महत्त्वाच्या संदर्भांमुळे हे पुस्तक चांगलेच चर्चेत आले आहे. या पुस्तकात ‘हडप्पा संस्कृती’चा उल्लेख ‘सिंधू सरस्वती संस्कृती’ असा करण्यात आलेला आहे. शिवाय अनेक ठिकाणी सरस्वती नदीचा उल्लेख आहे. हडप्पा संस्कृतीच्या पतनासाठी सरस्वती नदी कोरडी पडल्याचे एक प्रमुख कारण असल्याचे या पुस्तकात म्हटले आहे.

‘एक्सप्लोरिंग सोसायटी: इंडिया अँड बियॉन्ड’ हे समाजशास्त्राचे एनडीए सरकारने प्रकाशित केलेले पहिले पुस्तक आहे. या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीपासूनच हे पाठ्यपुस्तक शाळांमध्ये वापरले जाणार आहे. नव्या पाठ्यपुस्तकात, ‘बिगिनिंग ऑफ इंडियन सिविलायझेशन’ या धड्यात सरस्वती नदीचा उल्लेख आहे. तसेच यामध्ये हडप्पा संस्कृतीला ‘सिंधू-सरस्वती संस्कृती’ म्हणून संबोधले आहे. “सरस्वती नदी आज भारतात ‘घग्गर’ आणि पाकिस्तानमध्ये ‘हाकरा’ या नावाने ओळखली जाते” असं म्हणत ती हंगामी आहे असे म्हटले आहे. पुस्तकात दोन नकाशे देण्यात आलेले आहेत. एका नकाशात भारतीय उपखंडातील वेगवेगळ्या नद्या दाखवण्यात आल्या आहेत, तर दुसऱ्या नकाशात ‘सिंधू-सरस्वती संस्कृती’च्या मुख्य वसाहती सिंधू आणि तिच्या उपनद्यांसह दाखवल्या गेल्या आहेत.

शिवाय नवीन पाठ्यपुस्तकात हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास कसा झाला याची कारणे देताना दोन प्रमुख करणे देण्यात आली आहेत. एक म्हणजे वातावरणातील बदल, ज्यामुळे पावसावर परिणाम झाला, आणि पावसाचे प्रमाण कमी झाले. दुसरे म्हणजे सरस्वती नदी कोरडी पडली त्यामुळे या नदीच्या खोऱ्यात विकसित झालेली कालीबंगा किंवा बाणावली सारखी शहरे नामशेष झाल्याचे म्हटले आहे. जुन्या पाठ्यपुस्तकात हडप्पा शहरांच्या ऱ्हासासाठी देण्यात आलेल्या कारणांमध्ये सरस्वती नदी कोरडी पडल्याचा उल्लेख नाही.

हे ही वाचा:

जम्मू काश्मीरच्या राजौरीमध्ये लष्करी चौकीवर दहशतवाद्यांचा हल्ला; जवानांकडून चोख प्रत्युत्तर

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन यांची निवडणुकीतून माघार

बांगलादेशातील ५६ टक्के आरक्षण रद्द, ९३ टक्के जागा गुणवत्तेवर भरणार !

इस्रायलचा येमेनवर बॉम्ब हल्ला, तिघांचा मृत्यू, ८० जखमी !

यापूर्वी इतिहास, राज्यशास्त्र, भूगोल या विषयांसाठी स्वतंत्र पुस्तक होती. परंतु, नवीन अभ्यासक्रमात समाजशास्त्राचे एकच पुस्तक असणार आहे. समाजशास्त्राचे नवीन पुस्तक विद्यार्थ्यांच्या सोयीकरता ‘इंडिया अँड द वर्ल्ड: लँड अँड पिपल; टेपेस्ट्री ऑफ द पास्ट’; ‘अवर कल्चर हेरिटेज अँड नॉलेज ट्रॅडीशन्स’; ‘गव्हर्नन्स अँड डेमोक्रसी’; ‘इकॉनामिक लाईफ अराउंड अस’ या पाच प्रमुख विषयांमध्ये विभागले आहे.

Exit mobile version