एनसीबीमधून झाली बदली
मुंबईतील नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (एनसीबी) झोनल डायरेक्टर समीर वानखेडे आता महसूल गुप्तचर विभागात (डीआरआय) काम करणार आहेत. याआधी महसूल विभागातच ते काम करत होते. तिथून त्यांची नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये नियुक्ती झाली. या कार्यकाळात त्यांनी अमली पदार्थांच्या तस्कारीची अनेक प्रकरण उजेडात आणली.
शाहरुख खान पुत्र आर्यन खानला कॉर्डेलिया क्रूझवरून ताब्यात घेतल्यानंतर समीर वानखेडे हे अधिक चर्चेत आले. त्यांनी आर्यन खानला ताब्यात घेतले होते. राज्यातील अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचा जावई समीर खान यालाही एनसीबीने अटक केली होती. त्यानंतर नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर खासगी आरोप करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले होते.
महसूल सेवेत त्यांनी आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली होती. तिथून त्यांची एनसीबीमध्ये बदली झाली होती. त्यांचा एनसीबीमधील कार्यकाळ ३१ डिसेंबर २०२१ला संपुष्टात येणार असल्यामुळे त्यांना पुन्हा एनसीबीतच ठेवण्यात येणार की, तिथून त्यांची बदली होणार याविषयी चर्चा होती.
हे ही वाचा:
लसीकरणात भारत जगात सर्वोत्तम; पंतप्रधान मोदींचे कौतुक
मविआ सरकारच्या काळात चौथीच्या पुस्तकात इस्लामी शिकवण
आम्हाला जगू द्या, मारू नका! म्हणण्याची वेळ आली पुण्यातल्या शिवसेनेवर
जेवण दिले नाही म्हणून हॉटेल मालकाला घातली गोळी
समीर वानखेडे यांनी खोटे कागद सादर करून नोकरी मिळविल्याचा आरोप मलिक यांनी केला होता.
वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांच्यावरही नवाब मलिक यांनी आरोप केले होते. ज्ञानदेव वानखेडे हे दाऊद वानखेडे आहेत, असे नवाब मलिक यांचे म्हणणे होते. त्यावर रोज ट्विट करून, पत्रकार परिषदा घेऊन नवाब मलिक यांनी खळबळ उडविली होती. अखेर ज्ञानदेव वानखेडे यांनी न्यायालयात धाव घेतली. तिथे त्यांनी मलिक यांच्यावर सव्वा कोटीचा दावा केला होता. या खटल्याच्या सुनावणीत वानखेडे यांच्याबाबत कोणतेही ट्विट करण्यास न्यायालयाने नवाब मलिक यांना रोखले होते.