27 C
Mumbai
Monday, December 30, 2024
घरविशेष'मन्नत' च्या दारी एनसीबी अधिकारी

‘मन्नत’ च्या दारी एनसीबी अधिकारी

Google News Follow

Related

बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खान याच्या मन्नत या निवासस्थानी एनसीबीचे अधिकारी दाखल झाले आहेत. आर्यन खान ड्रग्स केस संदर्भात सद्ध्या एनसीबीच्या मार्फत केला जात आहे. याचाच एक भाग म्हणून एनसीबीचे अधिकारी मन्नत येथे दाखल झाल्याचे समजते. अंदाजे पाच ते सहा एनसीबी अधिकाऱ्यांचे पथक शाहरुख खानच्या म्हन्नत या निवासस्थानी पोहोचले आहेत. तर त्या आधी बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे हिच्या घरावरही एनसीबीने छापेमारी केल्याचे समजते.

शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान हा मुंबई येथे झालेल्या ड्रग्स क्रुज पार्टी प्रकरणात चांगलाच अडकला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आर्यन खान अटकेत आहे. त्याच्या बेलवर सुनावणी झाले नसून सध्या त्याचा मुक्काम मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये आहे. आर्यनच्या व्हाॅट्सॲप चॅट्स मधून अनेक महत्त्वाच्या बाबींचा उलगडा झाला असून आंतरराष्ट्रीय ड्रग रॅकेटशी त्याचा संबंध असण्याचा संशय अधिकाऱ्यांना आहे.

हे ही वाचा:

शाहरुख खान आर्यनच्या भेटीला!

मंगळवार पर्यंत आर्यन खान तुरुंगातच

बॉलीवूड अभिनेत्री अनन्या पांडे एनसीबीच्या रडारवर; आज होणार चौकशी

कौसा रुग्णालयाचा खर्च वाढता वाढता वाढे! २७ कोटींवरून १४७ कोटी

दरम्यान एनसीबी मार्फत या सर्व प्रकरणात तपास सुरू असून या तपासाचाच एक भाग म्हणून शाहरुख खान याच्या मन्नत या बंगल्यावर एनसीबीचे अधिकारी पोहोचले आहेत. पण ही कोणत्याही पद्धतीची छापेमारी नसून काही कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी एनसीबीचे अधिकारी मन्नतवर पोहोचले आहेत. तर त्यासोबतच अभिनेता चंकी पांडे याच्या घरावर एनसीबीने छापेमारी केल्याचे समजत असून अनन्या पांडे हिला एनसीबीने समन्स पाठवल्याचे समजत आहे.

आर्यन खानच्या व्हाॅट्सॲप चॅट मधून त्याचे एका बॉलीवुडमधील अभिनेत्री सोबत ड्रग्स संबंधातील संभाषण उघड झाले आहे. त्यामुळे ही अभिनेत्री म्हणजे अनन्या पांडे आहे का? असा सवाल आता उपस्थित होताना दिसत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा