मनोहर लाल खट्टर यांच्या राजीनाम्यानंतर नायब सिंग सैनी यांनी हरियाणाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.लोकसभा निवडणुकीपूर्वी हरियाणातील जनतेला नवा मुख्यमंत्री मिळाला आहे.भाजपचे प्रदेशाध्यक्ष नायब सिंग सैनी यांना मंगळवारी(१२ मार्च) राजभवनात राज्यपाल बंडारू दत्तात्रेय यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली.शपथ घेण्यापूर्वी नायबसिंग सैनी यांनी मनोहर लाल यांच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घेतले.
भाजप आणि जेजेपी यांची युती तुटल्यानंतर संपूर्ण मंत्रिमंडळाने आज सकाळी(१२ मार्च) राजीनामा दिला.यानंतर भाजपने स्वबळावर सरकार स्थापन करत नायब सिंग सैनी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.शपथविधी सोहळ्यात भाजप नेते कंवर पाल आणि मूलचंद शर्मा यांनीही हरियाणाच्या कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली.कंवर पाल गुर्जर हे माजी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या सरकारमध्ये शिक्षणमंत्री होते.
हे ही वाचा:
माध्यमांत आदिवासी पत्रकार कुठे आहेत, राहुल गांधींचा सवाल
सीएए बाबतीत अनेक आंतरराष्ट्रीय मिडीयाचा अपप्रचार
गुजरात: ४०० कोटी रुपयांच्या ड्रग्जसह सहा पाकिस्तानी लोकांना अटक!
हनीट्रॅप; माझगाव डॉकयार्डच्या अधिकाऱ्याला हेरगिरी प्रकरणी अटक
जेजेपीचे चार आमदार देवेंद्र बबली, ईश्वर सिंह, जोगीराम आणि राम निवास हे देखील शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते.मात्र, अनिल विज या कार्यक्रमाचा भाग बनले नाहीत.दरम्यान, नायबसिंग सैनी यांची मंगळवारी (१२ मार्च) विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली. त्यानंतर त्यांनी राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला.यानंतर आज ५ च्या सुमारास नायबसिंग सैनी यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
कोण आहेत नायब सिंग सैनी?
गेल्या लोकसभा निवडणुकीत नायबसिंग सैनी कुरुक्षेत्रातून भाजपचे खासदार म्हणून निवडून आले होते.नायबसिंग सैनी हे हरियाणा भाजपचे अध्यक्ष आहेत.ते ओबीसी समाजातील आहे. नायबसिंग सैनी हे मनोहर लाल खट्टर यांच्या जवळचे मानले जातात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोहर लाल खट्टर यांच्या संमतीनेच नायब सिंग सैनी यांचे मुख्यमंत्री पदासाठी नाव निश्चित करण्यात आले आहे.