32 C
Mumbai
Tuesday, November 19, 2024
घरविशेषनायबसिंग सैनी यांनी घेतली घेतली हरियाणाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ!

नायबसिंग सैनी यांनी घेतली घेतली हरियाणाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ!

भाजपचे सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन

Google News Follow

Related

भाजप नेते नायबसिंग सैनी यांनी गुरुवारी (१७ ऑक्टोबर) हरियाणाच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. नायबसिंग सैनी यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला. पंतप्रधान नरेंद्र मोदीसह भाजपचे दिग्गज नेते शपथ सोहळयाला उपस्थित होते.

हरियाणाचे राज्यपाल बंडारू दत्तात्रेय यांनी सैनी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. पंचकुलातील दसरा मैदानावर हा शपथविधी सोहळा पार पडला. नायबसिंग सैनी यांच्यासह १४ मंत्र्यांनी शपथ घेतली. नायब सिंह सैनी, अनिल विज, कृष्ण लाल पंवार, राव नरबीर, महिपाल ढांढा, विपुल गोयल, अरविंद शर्मा, श्याम सिंह राणा, रणवीर गंगवा, कृष्ण बेदी, श्रुति चौधरी, आरती सिंह राव, राजेश नागर, गौरव गौतम, यांनी मंत्री पदाची शपथ घेतली.

या सोहळ्याला पंतप्रधान मोदींसह केंद्रीय मंत्री अमित शहा, राजनाथ सिंह, नितीन गडकरी तसेच अन्य नेते उपस्थित होते. नायबसिंग सैनी यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. विशेष म्हणजे, भाजपने हरियाणामध्ये सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन केले. नायबसिंग सैनी यांची हरियाणा भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी काल (१६ ऑक्टोबर) निवडण करण्यात आली होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता.

हे ही वाचा : 

बाबा सिद्दीकींवर झाडलेल्या गोळ्या टर्किशमेड पिस्तूलातील!

राम गोपाल मिश्राच्या हत्येप्रकरणी मोहम्मद दानिशला अटक!

नागरिकत्व सुधारणा कायदा घटनेशी निगडीत, कलम-६ए वैध!

जस्टीन ट्रुडो अखेर झुकले; भारताविरोधात केवळ गुप्तचर यंत्रणांची माहिती, ठोस पुरावा नाही

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
192,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा