नक्षलवाद्यांचा होणार ‘दि एंड’

गृहमंत्री अमित शहांच्या अध्यक्षतेखाली आंतरराज्य समन्वय बैठक सुरू

नक्षलवाद्यांचा होणार ‘दि एंड’

छत्तीसगडच्या रायपूरमध्ये गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आंतरराज्य समन्वय बैठक सुरू झाली आहे. नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यासाठी आणि नक्षलग्रस्त भागातील पुनर्बांधणीसाठी ही बैठक होत आहे. या बैठकीत छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव सहाय, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री विजय शर्मा, मुख्य सचिव, पोलिस महानिरीक्षक आणि सात राज्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत.

या बैठकीत छत्तीसगड व्यतिरिक्त ओरिसा, झारखंड, तेलंगणा, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राचे मुख्य सचिव, डीजीपी आणि अधिकारी सहभागी होत आहेत. या आंतरराज्य समन्वय बैठकीत नक्षलग्रस्त भागात नक्षलवाद्यांच्या कारवाया थांबवणे आणि संयुक्त कारवाया करण्याच्या रणनीतीवर चर्चा केली जात आहे.

नक्षलग्रस्त राज्यांमधील नक्षलवाद्यांच्या एका राज्यातून दुसऱ्या राज्यात होणाऱ्या हालचालींवर पूर्णपणे नियंत्रण ठेवता येईल, हा या बैठकीचा मुख्य अजेंडा आहे. या बैठकीदरम्यान ही सात राज्ये आपापल्या राज्यांची रणनीती समजावून सांगतील आणि माहितीची देवाणघेवाण करण्याचे काम करतील.

हे ही वाचा:

मुरादाबाद बलात्कार प्रकरण; आरोपी शाहनवाजच्या कुटुंबाचे ३ मदरसे सील !

पंतप्रधान मोदी, योगींचे कौतुक केल्यामुळे मुस्लीम महिलेला पतीकडून ‘तिहेरी तलाक’

नालासोपार्‍यात १७ वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या दोघांना अटक

आसाम गँगरेप: मुख्य आरोपी पोलिसांच्या तावडीतून पळाला, तलावात उडी मारून मृत्यू

दरम्यान, देशातील एकूण ३८ जिल्ह्यांपैकी छत्तीसगडमधील १५ जिल्हे नक्षलग्रस्त आहेत. यामध्ये विजापूर, बस्तर, दंतेवाडा, धमतरी, गरीबीबंद, कांकेर, कोंडागाव, महासमुंद, नारायणपूर, राजनांदगाव, मोहला-मानपूर-अंबागड चौकी, खैरागड छूई खान गंडई, सुकमा, कबीरधाम आणि मुंगेली जिल्ह्यांचा समावेश आहे. तुम्हाला सांगूया की छत्तीसगडमध्ये देशातील सर्वाधिक नक्षलग्रस्त जिल्हे आहेत. छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या २०२३ च्या आधीच्या दौऱ्यात अमित शाह म्हणाले होते की, राज्यात सरकार बनवल्यानंतर सर्वप्रथम नक्षलवादाचा नायनाट करायचा आहे. अशा स्थितीत या बैठकीला त्या आश्वासनाच्या संदर्भात पाहिले जात आहे.

Exit mobile version