‘नक्षलवाद्यांनी जमिनीत पुरलेले २० किलो आयडी जागीच निष्प्रभ’

जवानांकडून परिसरात शोध मोहीम सुरु

‘नक्षलवाद्यांनी जमिनीत पुरलेले २० किलो आयडी  जागीच निष्प्रभ’

छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यात जवानांनी नक्षलवाद्यांचा नापाक मनसुबा उधळून लावला आहे. जवानांनी बीडीएस टीमच्या मदतीने दंतेवाडा जिल्ह्यातील बॅरेम आणि पोतलीकडे जाणाऱ्या रस्त्यांवर नक्षलवाद्यांनी जमिनीत पेरलेले आयईडी जप्त केले आणि ते जागेवरच निकामी केले आहेत.घातपाताच्या उद्देशाने नक्षलवाद्यांनी रस्त्यावर १०-१० किलो वजनाचे आयईडी बॉम्ब पेरले होते.

रस्त्यावर बॉम्ब पेरल्याची माहिती जवानांना मिळाली होती.यानंतर सैनिक आणि बीडीएस टीमने बॅरेम आणि पोतलीकडे जाणाऱ्या रस्त्याची तपासणी केली असता, दोन वेगवेगळ्या रस्त्यांवर नक्षलवाद्यांनी ठेवलेले १०-१० किलो वजनाचे आयईडी बॉम्ब सापडले. यानंतर बीडीएसच्या पथकाने आयईडी बॉम्बचा स्फोट करून तो घटनास्थळी निकामी केला.यामुळे मोठा अनर्थ टळला असून जवानांकडून शोधमोहीम सुरु आहे.

हे ही वाचा:

रिकामं डोकं कुलगुरूंची अक्कल काढते तेव्हा..

झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अंतरिम जामीन नाहीच

पाकव्याप्त काश्मीर जम्मू काश्मीरमध्ये निदर्शने

जिवंतपणी काय मृत्यूनंतरही तुम्ही मला जमिनीत गाडू शकत नाहीत!

दरम्यान, दोन वर्षांपूर्वी दंतेवाडा जिल्ह्यातील याच अरणपूर रस्त्यावर नक्षलवाद्यांनी आयईडी पेरला होता, यावेळी याच मार्गावरून डीआरजी जवानांची गाडी जात असताना स्फोट झाला.या अपघातात चालकासह १० डीआरजी जवान शहीद झाले होते.पुन्हा एकदा नक्षलवाद्यांनी एकाच मार्गावर दोन वेगवेगळ्या ठिकाणी १०-१० किलो वजनाचे आयईडी बॉम्ब पेरले होते, पण जवानांनी त्यांचा हा डाव हाणून पाडला आहे.

 

Exit mobile version