नारायणपूरमध्ये नक्षलवाद्यांचा आयटीबीपी पोलिस कॅम्पवर हल्ला, जीवितहानी नाही!

सुरक्षा दलांकडून शोध सुरु

नारायणपूरमध्ये नक्षलवाद्यांचा आयटीबीपी पोलिस कॅम्पवर हल्ला, जीवितहानी नाही!

छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त बस्तर विभागात नक्षलवाद्यांची दहशत कायम आहे.कोहकमेटा पोलीस ठाण्याच्या हद्दीत नव्याने स्थापन झालेल्या इरकभट्टी कॅम्पवर बीजीएलसह नक्षलवाद्यांनी हल्ला केला आहे.बुधवारी (५ जून) रात्री ही घटना घडली.दरम्यान, जवानांच्या सतर्कतेमुळे कोणतीही हानी झालेली नसून सुरक्षा दलांकडून परिसरात शोध मोहीम सुरु आहे.

नारायणपूरचे एसपी प्रभात कुमार म्हणाले, कोहकमेटा पोलीस स्टेशनच्या हद्दीत नव्याने स्थापन करण्यात आलेल्या इरकभट्टी कॅम्पवर नक्षलवाद्यांनी ४ स्वदेशी बीजीएल लॉन्चर डागले आणि गोळीबार सुरु केला.डागण्यात आलेल्या ४ स्वदेशी बीजीएल लॉन्चर पैकी १ बीजीएलचा स्फोट झाला.मात्र कोणतेही नुकसान झाले नाही आणि जीवितहानी देखील झाली नाही.नक्षलवाद्यांच्या हल्ल्यानंतर जवान सतर्क झाले आणि प्रत्युत्तरात जोरदार गोळीबार केला.जवानांचा वाढता प्रभाव पाहून नक्षलवाद्यांनी जंगलात पळ काढला.

हे ही वाचा:

नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याला बांगलादेशच्या पंतप्रधान आणि श्रीलंकेचे अध्यक्ष उपस्थित राहणार?

इस्रायलकडून गाझामधील शाळेवर हल्ला; २७ जण ठार

अयोध्येतील पराभवानंतर रामायणातील ‘लक्ष्मण’ नाराज

अवघी २.५ टक्के मते, आठ जागांवर विजय

नक्षलवाद्यांच्या या हल्ल्यात एकाही जवानाला इजा झालेली नाही. छावणीच्या सुरक्षेच्या आघाडीवर तैनात असलेल्या सैनिकांच्या सतर्कतेमुळे इतर सैनिक सतर्क झाले. जवानांनी तात्काळ जबाबदारी स्वीकारली आणि नक्षलवाद्यांना प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली, अन्यथा नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात आयटीबीपीच्या जवानांचे मोठे नुकसान झाले असते, असे एसपी प्रभात कुमार म्हणाले.

 

Exit mobile version