बालाघाटमध्ये चकमक, १४ लाखांचे बक्षीस असलेला नक्षलवादी ठार!

सुरक्षा दलाची परिसरात कारवाई सुरु

बालाघाटमध्ये चकमक, १४ लाखांचे बक्षीस असलेला नक्षलवादी ठार!

छत्तीसगडच्या बालाघाटमध्ये पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली आहे. या चकमकीत १४ लाख रुपयांचे बक्षीस असलेला नक्षलवादी ठार झाला आहे. पोलीस अधीक्षक समीर सौरभ यांनी याबद्दल माहिती दिली.

पोलीस अधीक्षक समीर सौरभ यांनी सांगितले की, हट्टा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोठियाटोला येथे पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. दोन्ही बाजूंनी गोळ्या झाडण्यात आल्या. यामध्ये १४ लाख रुपयांचे बक्षीस असणारा नक्षलवादी ठार झाला. उकास सोहन असे ठार झालेल्या नक्षलवाद्याचे नाव आहे. उकास हा बस्तर विजापूरचा रहिवासी होता. परिसरात अजूनही कारवाई सुरूच असल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. या घटनेनंतर जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

हे ही वाचा:

सर्वोच्च न्यायालयाची ममता सरकारला पुन्हा चपराक

नरेंद्र मोदी ४१ वर्षांनी ऑस्ट्रिया दौऱ्यावर जाणारे ‘पंतप्रधान’

पुण्यात हिट अँड रनची आणखी एक घटना, गस्तीवर असलेल्या हवालदाराला कारने चिरडले!

मुंबईतील पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे कंट्रोल रूममध्ये

दरम्यान, तीन महिन्यांपूर्वी बालाघाटमध्ये पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली होती. मध्यप्रदेश-छत्तीसगडच्या सीमेवरील केझारी जंगलात झालेल्या चकमकीत २९ लाख आणि १४ लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या दोन नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले होते. सजंती उर्फ ​​क्रांती (३८) आणि रघु उर्फ ​​शेर सिंग (५८) असे ठार करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांची नावे आहेत. मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील अनेक घटनांमध्ये या दोघांचा सहभाग होता.

Exit mobile version