26 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषनक्षलवाद्यांचे ‘हमास’ला समर्थन; महाराष्ट्र- छत्तीसगड सीमेवर लावले फलक

नक्षलवाद्यांचे ‘हमास’ला समर्थन; महाराष्ट्र- छत्तीसगड सीमेवर लावले फलक

सुरक्षा यंत्रणा सतर्क

Google News Follow

Related

इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधील हमास दहशतवादी गटामध्ये युद्ध अद्याप सुरूचं असून दोन्ही बाजूंनी मोठी जीवितहानी आणि वित्तहानी झालेली आहे. अशातच या सुरू असलेल्या युद्धात पॅलेस्टाईनकडून लढणाऱ्या ‘हमास’ या अतिरेकी संघटनेला नक्षलवाद्यांनी समर्थन दिले आहे. ही संघटना पॅलेस्टाईन जनतेसाठी संघर्ष करीत आहे, असा उल्लेख करून नक्षलवाद्यांनी छत्तीसगढ- महाराष्ट्र सीमेवरील प्रतापपुर जंगल परिसरात फलक लावला आहे.

नक्षलवाद्यांनी फलक लावल्यामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. २ ते ८ डिसेंबरदरम्यान नक्षलवाद्यांकडून ‘पीएलजीए’ सप्ताह पाळला जातो. यादरम्यान नक्षलप्रभावित क्षेत्रात ते हिंसक कारवाया करतात. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेल्या छत्तीसगडमधील जंगल परिसरात गुरूवार, ३० नोव्हेंबर रोजी नक्षलवाद्यांनी दोन फलक लावले आहेत.

या फलकावर त्यांनी इस्रायलचा विरोध केला असून पॅलेस्टाईनकडून लढणाऱ्या ‘हमास’ या अतिरेकी संघटनेला समर्थन दिले आहे. हमास ही दहशतवादी संघटना नसून ते पॅलेस्टाईनमधील जनतेच्या मुक्तीसाठी संघर्ष करीत आहे. त्यामुळे पॅलेस्टाईनला समर्थन देऊन त्यांचे हात मजबूत करा, असे आवाहन नक्षलवाद्यांनी केले आहे.

हे ही वाचा:

राजस्थान, मध्य प्रदेशात भाजप; तेलंगणात बीआरएसपेक्षा काँग्रेस सरस

९७ तेजस विमाने, १५० हुन अधिक लढाऊ हेलिकॉप्टर खरेदीस सरकारने दिली मंजुरी!

दत्ता दळवी यांचे पाप प्रकाश आंबेडकरांपेक्षा मोठे आहे का?

योग हा व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग

छत्तीसगड विधानसभा निवडणुकीदरम्यान नक्षलवाद्यांनी काही भाजपा समर्थकांची हत्या केली होती. त्यानंतर शेजारच्या गडचिरोली जिल्ह्यात देखील लागोपाठ तिघांची हत्या केली. त्यामुळे ‘पीएलजीए’ सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर सीमाभागात दहशतीचे वातावरण आहे. शिवाय त्यांनी हमासला पाठींबा दिल्यामुळे आणखी चिंता व्यक्त केली जात आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा