24 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेष'नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांचे निधन'

‘नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांचे निधन’

काही दिवसांपूर्वी झाला होता अपघात, सुरु होते उपचार

Google News Follow

Related

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांच्या कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांचे निधन झाले आहे. समीर खान यांचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता आणि त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. पण त्यांचे प्रयत्न अपयशी ठरले.

समीर खान यांच्यावर कोहीनूर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. तसेच त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली होती. पण आज त्यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. नवाब मलिक यांची कन्या अणुशक्तीनगरच्या उमेदवार आहेत. मात्र, निवडणुकीच्या तोंडावर अशा घटनेमुळे अणुशक्तीनगर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

समीर खान यांच्या मृत्यूची माहिती स्वतः नवाब मलिक यांनी ट्वीटरवर दिली. नवाब मलिक ट्विटमध्ये म्हणाल,  माझे जावई समीर खान यांचे निधन झाले आहे. अल्लाह त्यांना जन्नतमध्ये सर्वोच्च स्थान देवो. या नुकसानीबद्दल आम्ही शोक व्यक्त करत आहोत. या घटनेमुळे आपले पुढील दोन दिवसांचे सर्व नियोजित कार्यक्रम पुढे ढकलण्यात आले आहेत, असे नवाब मलिक यांनी म्हटले.

हे ही वाचा :

धक्कादायक! १३ वर्षीय मुलाच्या पोटात आढळल्या काच, नट-बोल्ट, बॅटरीसारख्या ५६ वस्तू

भारताची न्यूझीलंडपुढे सपशेल शरणागती, कसोटी मालिकेत ०-३ हार

कॅनडाने आता अधिकृतपणे भारताला ‘राज्य शत्रू’ म्हणून संबोधले

केजरीवाल यांची रेवडी…पुन्हा सत्ता आल्यास पाणी आणि वीज बिले माफ करणार

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा