नवाब मलिक अजित पवारांच्या वर्गात शेवटच्या बाकावर?

विधानभवनात दाखल झाल्यानंतर नवाब मलिकांनी अजित पवार आणि शरद पवार गटातील नेत्यांची घेतली भेट

नवाब मलिक अजित पवारांच्या वर्गात शेवटच्या बाकावर?

७ डिसेंबर पासून राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली.या अधिवेशनात लक्ष वेधून घेतले ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांनी.हिवाळी अधिवेशनासाठी नवाब मलिक यांनी नागपुरात हजेरी लावली. यावेळी अजित पवार आणि शरद पवार गटातील नेत्यांनी नवाब मलिक यांची भेट घेतली. तसेच सभागृह परिसरात नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांची गळाभेट झाली.त्यांनतर सभागृहाचं कामकाज सुरु झाल्यानंतर नवाब मलिक सत्ताधारी पक्षाच्या बाकावर सर्वात शेवटी बसले. त्यामुळे नवाब मलिक यांचा अजित पवार गटाला पाठिंबा असल्याचे चित्र दिसत आहे.

नवाब मलिक हे सध्या वैद्यकीय जामिनावर बाहेर आहे.तर आतापर्यंत त्यांनी आपण राष्ट्रवादीच्या दोन्ही गटापैकी कोणत्या गटात सहभागी होणार याबाबत भूमिका स्पष्ट केली नव्हती.तसेच आमदार नवाब मलिक हे कोणत्या गटात सहभागी होणार याबाबत कालपासून चर्चा सुरू होती.मात्र, नवाब मलिक यांनी विधानभवनात दाखल झाल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार गटातील नेत्यांची भेट घेतली आणि नवाब मलिक सत्ताधारी बाकावर बसले.नवाब मलिक हे सत्तधारी बाकांवर सर्वात शेवटी जाऊन बसले. त्यामुळे आता मलिक अजित पवार गटात सहभागी झाल्याचे चर्चा पाहायला मिळत आहे.

हे ही वाचा:

‘अशोक गेहलोत, पोलिसांनी सुरक्षा पुरवली नाही’

‘पूरपरिस्थिती असूनही मुंबईची न्यायालये काम थांबवत नाहीत’

सन २०२०पासून आतापर्यंत भारतीय संघाला लाभले ३२ सलामीवीर!

स्वानंद किरकिरे आणि ‘ऍनिमल’ टीममध्ये जुंपली!

दरम्यान, नवाब मलिक हे सत्तधारी बाकांवर सर्वात शेवटी जाऊन बसले असले तरी त्यांनी अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही.त्यामुळे मलिकांची भूमिका काय असणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Exit mobile version