नौदलाचे निवृत्त अधिकारी अभिलाष टॉमी यांनी खडतर अशी सागरी जगभ्रमण मोहीम पूर्ण केल्यानंतर आता भारतीय नौदलाने यासाठी एका महिलेला पाठवण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू केला आहे. ही महिला अधिकारी स्वत: नौकेवरून जगभर प्रवास करेल.
नौदलाने यासाठी लेफ्टनंट कमांडर दिलना के आणि लेफ्टनंट कमांडर रूपा अलागिरी सामी यांची निवड केली आहे. त्यांच्या प्रशिक्षणाचा भाग म्हणून, त्यांनी ट्रान-अटलांटिक क्रॉसिंगसह सुमारे १७ हजार समुद्री मैलाचा प्रवास प्रवास केला आहे. या दोघींपैकी एक सागरी जगभ्रमणाच्या आव्हानात्मक मोहिमेसाठी कूच करेल. या सर्वांतील आश्चर्यजनक बाब म्हणजे या दोन्ही महिलांनी अवघ्या दोन वर्षांपूर्वीच नौकानयनला सुरुवात केली आहे.
दिलना या नौदलात लॉजिस्टिक अधिकारी आहेत, तर रूपा नौदल शस्त्रास्त्र तपासणी अधिकारी आहेत. अवघ्या दोन वर्षांत दिलना, रूपा यांनी २१ हजार ८०० नॉटिकल मैल प्रवास केला आहे. त्या दोघी सध्या गोव्यातील ओशन सेलिंग नोड येथे तैनात आहेत. नाविका सागर परिक्रमेचेही हेच अंतर आहे.
हे ही वाचा:
‘द केरळा स्टोरी’ला विरोध करणारे आयसीसचे समर्थक
गंमतच आहे सगळी!! मुक्त पत्रकारितेच्या बाबतीत अफगाणिस्तान भारतापेक्षा सरस
घरावर मिग- २१ विमान कोसळून दोघांचा मृत्यू
नेपाळी शेर्पांना आता नकोशी झाली आहे पर्वतराजींची वाट!
दिलना आणि रूपा यांच्यासह सहा सदस्यांच्या क्रूने अलीकडेच प्रतिष्ठित ट्रान्स अटलांटिक सागरी शर्यत- केप २ ते रिओ शर्यतीत सहभाग घेतला आहे. ही शर्यत केपटाऊन ते रिओ डि जेनेरिओ अशी आहे. हा क्रू २४ मेपर्यंत गोव्यात परतणे अपेक्षित आहे. या दोन महिला, इतर अनुभवी खलाशांसह, दिवारबेस्ड एक्वेरियस शिपयार्ड येथे बांधलेल्या १७ मीटर लांबीच्या आयएनएसव्ही तारिणी बोटीमधून प्रवास करत आहेत. दोघींच्याही प्रशिक्षणाच्या पहिल्या टप्प्यात कोची, विशाखापट्टणम आणि मॉरिशसच्या मोहिमांसह किनारपट्टीवरील नौकानयनाचा समावेश आहे. त्यांचा क्रू १७ नोव्हेंबरला रिओ डी जेनेरोला रवाना झाला असून ख्रिसमसच्या दिवशी केपटाऊनला पोहोचला.