23.4 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरविशेषशिवरायांच्या पुतळ्याची जबाबदारी नौदलाकडे, सरकार मोठा पुतळा उभारेल !

शिवरायांच्या पुतळ्याची जबाबदारी नौदलाकडे, सरकार मोठा पुतळा उभारेल !

उपमुख्यमंत्री फडणवीसांनी केले स्पष्टीकरण

Google News Follow

Related

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील राजकोट किल्ल्यावर बसवण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काल अचानकपणे कोसळला होता. ४ डिसेंबर २०२३ रोजी पंतप्रधान मोदींच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळ्या कोसळल्याने शिवभक्तांकडून संताप व्यक्त होत आहे तर विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टीका होत आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावर भाष्य केले आहे.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, एक दिवसापूर्वी कोसळलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बांधकामाची देखरेख राज्य सरकारने नव्हे तर भारतीय नौदलाने केली होती. प्रसारमाध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, पूर्वीचा पुतळा नौदलाने बांधला होता, तसाच मोठा पुतळा राज्य सरकार बसवणार आहे.

हे ही वाचा :

डॉक्टर बलात्कार-हत्येप्रकरणी भाजपकडून उद्या बंगाल बंदची हाक !

मध्य प्रदेशातील पोलिस ठाण्यावर दगड फेकणारा शहजाद अली पोलिसांच्या ताब्यात !

केजरीवालांच्या न्यायालयीन कोठडीत ३ सप्टेंबरपर्यंत वाढ

कॅनडामधील ७० हजारपेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय विद्यार्थांना निर्वासित होण्याचा धोका

ते पुढे म्हणाले, पुतळ्याच्या निर्मितीसाठी आणि स्थापनेसाठी जबाबदार असलेल्या व्यक्तींनी वाऱ्याचा वेग आणि वापरलेल्या लोखंडाची गुणवत्ता, यासारख्या महत्त्वाच्या स्थानिक घटकांकडे दुर्लक्ष केले असावे. सागरी वाऱ्यांच्या संपर्कात आल्याने पुतळ्याला गंज लागण्याची शक्यता अधिक आहे, असे फडणवीस म्हणाले. पुतळा बनवण्याआधी या सर्व बाबींचे निर्मात्यांनी आकलन केले होते का, हा प्रश्न आहे. पुतळा कोसळण्याच्या घटनेची चौकशी सुरू आहे. त्याच जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठा पुतळा उभारण्याचा आमचा संकल्प आहे, असे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

दरम्यान, या प्रकरणी स्थानिक पोलिसांनी ठेकेदार जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील यांच्याविरुद्ध सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा