भारतीय नौदलाचे हेलिकॉप्टर अरबी समुद्रात कोसळले आहे. त्यात तीन क्रू मेंबर्स होते. ध्रुव हेलिकॉप्टर मदत आणि बचाव कार्यात वापरण्यासाठी तैनात करण्यात आले होते. मात्र उड्डाणानंतर काही वेळातच त्याचे अरबी समुद्रात मुंबईच्या किनारपट्टीवर इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. तिन्ही क्रू मेंबर्सना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.
एका अधिकाऱ्याने सांगितले की, भारतीय नौदलाच्या अॅडव्हान्स लाइट हेलिकॉप्टरने बुधवारी मुंबई किनारपट्टीवर आपत्कालीन लँडिंग केले. नौदलाच्या गस्ती विमानाने क्रूची सुटका केली. क्रू मेंबर्सना बाहेर काढण्यासाठी नौदलाच्या क्राफ्टचा वापर करण्यात आला आहे. तात्काळ शोध आणि बचावकार्य सुरु करण्यात आले. याप्रकरणी नौदल कमांडने चौकशीचे आदेश दिले आहेत.
हे ही वाचा:
सुरक्षा दलांनी मोठा कट उधळून लावला, बारामुल्लामध्ये २ दहशतवाद्यांना अटक
विधानसभेत आज होणार ‘महिला लक्षवेधी’
आफताब हा प्रशिक्षित शेफ असल्याने त्याला मांस कसे साठवतात ते ठाऊक होते!
ध्रुव हे सुमारे १६ मीटर लांबीचे हे हेलिकॉप्टर नौदल, तटरक्षक दल आणि हवाई दलातही वापरले जाते. हे हेलिकॉप्टर कोणत्याही हवामानात उड्डाण करू शकते आणि दिवसा किंवा रात्री शत्रूवर हल्ला करू शकते. बचावापासून ते हल्ल्यापर्यंत सर्वत्र त्याचा चांगला वापर करता येतो.हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडने आतापर्यंत अशा २५० पेक्षा जास्त हेलिकॉप्टरची निर्मिती केली आहे. या हेलिकॉप्टरला भारतातच नाही तर परदेशातही पसंती मिळत आहे. भारतीय हवाई दलात मार्च २००२ मध्ये पहिल्यांदा ध्रुव हेलिकॉप्टरचा समावेश करण्यात आला