नौदलाच्या चेतक हेलिकॉप्टरचा अपघात

अपघातात ग्राउंड स्टाफचा मृत्यू

नौदलाच्या चेतक हेलिकॉप्टरचा अपघात

भारतीय नौदलाचे चेतक हेलिकॉप्टर अपघातग्रस्त झाल्याची माहिती समोर आली आहे. देखभाल-दुरुस्ती दरम्यान हा अपघात झाला. यात नौदलाच्या ग्राउंड स्टाफच्या सदस्याचा मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना शनिवार, ४ नोव्हेंबर रोजी कोचीमधील आयएनएस गरुड या नेव्हल एअर स्टेशनच्या धावपट्टीवर घडली.

कोचीमधील आयएनएस गरुड या नेव्हल एअर स्टेशनच्या धावपट्टीवर देखभाल दुरुस्तीचे काम सुरू होते. नेव्हल एअर स्टेशनवर टॅक्सी देखभाल दुरुस्तीदरम्यान हा अपघात झाला. नौदलाच्या प्रवक्त्याने ट्विटरवर याबाबत निवेदन सादर केले आहे. नौदलाच्या निवेदनानुसार चेतक हेलिकॉप्टरचा आयएनएस गरुड, कोची येथे देखभाल टॅक्सी तपासणीदरम्यान जमिनीवर अपघात झाला, परिणामी एका ग्राउंड क्रूचा सदस्य योगेंद्र सिंग यांचा मृत्यू झाला.

हे ही वाचा:

बीडमध्ये मराठा आरक्षणासाठी जाळपोळ करणाऱ्यांच्या मालमत्ता जप्तीतून करणार वसुली

छत्तीसगडमधील काँग्रेसने तर ‘महादेव’लाही सोडले नाही!

उद्योगपती अबानींना धमकी देणारा अखेर अटकेत

विदर्भ, मराठवाड्यातील दुग्धविकास प्रकल्पांतून ३ लाख रोजगार निर्मिती

नौदालाने अपघाताच्या कारणांचा शोध घेण्यासाठी चौकशी मंडळाला आदेश दिले आहेत.भारतीय नौदल प्रमुख ऍडमिरल आर हरी कुमार आणि सर्व नौदल कर्मचाऱ्यांनी ग्राउंड क्रू मेंबर योगेंद्र सिंग यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

Exit mobile version