नवजीवन कार्यकारी संघाकडून ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे’ यांना अभिवादन !

अण्णाभाऊ साठे आणि जय लहुजींच्या जयघोषाने दुमदुमला परिसर

नवजीवन कार्यकारी संघाकडून ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे’ यांना अभिवादन !

वरळी कोळीवाड्यातील नवजीवन कार्यकारी संघाकडून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०४ वी जयंती ११ ऑगस्ट रोजी जल्लोषात साजरी करण्यात आली. महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेते संदीप देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना वरळी विभाग प्रमुख संतोष धुरी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसेच थोर समाजसेवक सुरेश (दादा) कोठेकर, समाजसेवक भरत वरळीकर, तसेच लहुजी शक्ती सेना धारावी अध्यक्ष सचिन साठे आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.

जयंती निमित्त नवजीवन कार्यकारी संघाकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा, वृक्षारोपण, सत्कार समारंभ आणि विविध स्पर्धांचे आयोजन संघाकडून करण्यात आले होते. या कार्यक्रमास सर्वांना उपस्थित राहण्याचे आवाहन नवजीवन कार्यकारी संघाकडून करण्यात आले होते. कार्यक्रमाची तशी निमंत्रण पत्रके वाटण्यात आली होती. परिसरातील नागरिकांनी देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून उत्साह दाखवला.
यामध्ये लहान मुले- मुली, महिलांचा मोठा सहभाग दिसून आला. परिसरातील लहान मुलांनी अण्णाभाऊ साठे यांच्यावर भाषणही केले. यावेळी अण्णाभाऊ साठे आणि जय लहुजींच्या जयघोषाने परिसर अगदी दुमदुमून गेला होता.

हे ही वाचा:

बंगालच्या सीमेवर बांगलादेशी तस्करांचा बीएसएफ जवानांवर हल्ला, कारवाईत एक ठार !

शरद पवारांना धक्का; सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकरांचा भाजपात प्रवेश !

ठाकरेंचे लोणचे घालण्याची प्रक्रिया सुरू!

पराठ्याचे दुकान चालवणारा महिलांना पाठवत होता अश्लिल व्हीडिओ, केली अटक

 

May be an image of 3 people and text

May be an image of 9 people, temple and textMay be an image of 12 peopleMay be an image of 4 people, beard, people smiling and text

 

Exit mobile version