हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या स्मृत्यर्थ प्रतिवर्षी २९ ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवसाच्या निमित्ताने देशभरात विविध क्रीडाविषयक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. २९ ऑगस्ट हा दिवस म्हणजे मेजर ध्यानचंद यांची जयंती. महाराष्ट्रातही या निमित्ताने अशाच कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने क्रीडा मंत्री महाराष्ट्र राज्य गिरीश महाजन हे या कार्यक्रमात सहभागी होणार असून ते मीडियाशी संवाद साधणार आहेत. सकाळी ९ वाजता सर्व मान्यवर मुंबई हॉकी असोसिएशन, चर्चगेट येथे एकत्र येणार आहेत. तिथे हॉकीसाठी ज्यांनी आयुष्य वाहिले अशा मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करणार आहेत.
हे ही वाचा:
‘विहिरीत उडी मारेन पण काँग्रेसमध्ये जाणार नाही’
भारताचे ‘हार्दिक’ अभिनंदन; पाकिस्तानला नमविले
कोळशाच्या खाणीमुळे चक्क १०० फूट गाडले गेले घर
उध्दव ठाकरे ‘ब्रिगेडी’यर झाले; फायदा कुणाला, तोटा कुणाला?
हा कार्यक्रम पार पडल्यावर तेथून १० वाजता डॉन बॉस्को,माटुंगा शाळेत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तेथे आंतरराष्ट्रीय व ऑलिम्पिक खेळाडूंचा सत्कार करण्यात येणार आहे. शिवाय रिदमीक जिम्नॅस्टिक्स आणि साहसी खेळांचे प्रात्यक्षिक दाखविण्यात येणार आहे.