26 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरविशेषमहाराष्ट्र, कर्नाटक, कोल्हापूर, रेल्वे बाद फेरीत धडकले

महाराष्ट्र, कर्नाटक, कोल्हापूर, रेल्वे बाद फेरीत धडकले

Google News Follow

Related

एमएलबी खेळ परिसर, राईट टाऊन, जबलपूर, मध्य प्रदेश येथे आयोजित करण्यात आलेल्या ५४ व्या राष्ट्रीय पुरुष-महिला अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत महाराष्ट्र, कर्नाटक, कोल्हापूर, रेल्वे, विमान प्राधिकरण बाद फेरीत फेरीत पोहचले आहेत.

महाराष्ट्राच्या पुरुष संघाने ‘ब’ गटातील हरयाणावर २०-०९ असा एक डाव ११ गुणांनी धुव्वा उडवला. या सामन्यात महाराष्ट्राच्या प्रतिक वाईकर (नाबाद २:५० मि. संरक्षण व १ गडी), ऋषिकेश मुर्चावडे (२:२० मि. संरक्षण व १ गडी), अक्षय भांगरे (२:०० मि. संरक्षण व २ गडी), अरुण गुणकी (२:४० मि. संरक्षण व २ गडी) व मिलिंद कुरपे (७ गडी)  तर पराभूत हरयाणाच्या अमित व ध्रुवने प्रत्येकी १:१० मि. संरक्षण केले.

महिलांमध्ये महाराष्ट्राने ‘ब’ गटातील मध्य भारतवर १२-०५ असा एक डाव ०७ गुणांनी मोठा पराभव केला. या सामन्यात महाराष्ट्राच्या रुपाली बडे (४:०० मि. संरक्षण), रेश्मा राठोड ( ३:४०, २:३० मि. संरक्षण व १ बळी), अपेक्षा सुतार (नाबाद १:२० मि. संरक्षण व ४ बळी) व  कर्णधार प्रियांका इंगळे (२:५० मि. संरक्षण व २ बळी) यांनी केलेल्या बहारदार खेळीने महाराष्ट्राला मोठा विजय सहज मिळाला. तर मध्य भारतच्या रीतिकाने (१:५० मि. संरक्षण) एकाकी लढत दिली.

पुरुषांच्या ‘क’ गटातील कोल्हापूराने पाँडिचेरीवर १९-०९ असा एक डाव १० गुणांनी विजय मिळवला. या सामन्यात कोल्हापूरच्या सागर पोतदार (२:२०, १:१० मि. संरक्षण), अवधूत पाटील (३:१० मि. संरक्षण) व रोहण शिगटे (५ गडी) यांनी चकदार कामगिरी केली तर पराभूत संघाकडून कोणीही चमकदार कामगिरी केली नाही.पुरुषांच्या ‘अ’ गटातील रेल्वेने यजमान मध्य प्रदेशचा १८-०९ असा एक डाव ९ गुणांनी पराभव केला. रेल्वेच्या महेश शिंदे (३:०० मि. संरक्षण व १ गडी), मिलिंद चवरेकर (नाबाद १:५० मि. संरक्षण व २ गडी), विजय हजारे (१:५० मि. संरक्षण) यांनी केलेल्या खेळाच्या जोरावर सहज विजय मिळवला.

इतर निकाल : महिलांमध्ये ‘ग’ गटातील पंजाब विरुध्द केरळ हा सामना ११-११ असा बरोबरीत संपला.

पुरुष: दिल्लीने बिहारचा २३-९, मध्य भारताने आसामचा २०-०८, ओरीसाने जम्मू कश्मीरचा २४-०२ तामीळनाडूने त्रिपुराचा २६-७ असा पराभव केला.

महिला: विदर्भाने मध्य भारताचा १०-०७, प. बंगालने झारखंडचा १८-०३, गुजरातने हिमाचल प्रदेशचा १०-०६, तामिळनाडूने उत्तराखंडचा १४-१२, भारतीय विमानतळ प्राधिकरणने उत्तर प्रदेशचा २०-०४ असा पराभव केला.

हे ही वाचा:

आदित्यजी, अजित दादांकडे राज्याचं नेतृत्व द्या

‘ठाकरे सरकारने डिग्री विकायला काढल्या तर आश्चर्य वाटणार नाही’

एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली

काँग्रेसचे हे दोन दिग्गज नेते भाजपात सामील

 

महिलांच्या मॅटवरवरील सामन्यात खेळताना राजस्थांनाची एक महिला खेळाडू आक्रमण करताना मॅटवरव अडखळून जखमी झाली. तर पुंदेचेरीचा एक पुरुष खेळाडु मातीवरील मैदानात संरक्षण करताना अडखळून जखमी झाला. या दोन्ही खेळाडूंना प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले आहे.

राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत पावसाची हजेरी 

या स्पर्धेत आज तिसर्‍या दिवशी सकाळी चार सामने झाल्यावर पावसाने जोरदार हजेरी लावली. जोरजोराचा वारा व पाऊस यामुळे क्रीडांनागरीत पळापळ झाली. सर्वजण मिळेल तो आडोसा घेत पांगापांग झाली. मात्र लगेचच भारतीय खो-खो महासंघाचे सचिव एम. एस. त्यागी व त्यांच्या सर्व सहकार्‍यांनी निर्णय घेत आच्छादित असलेल्या मॅटच्या क्रीडांगांनावर सामने घेण्यास सुरुवत केली व त्याचबरोबर मातीची क्रीडांगण सुकवून त्यावरही सामने घेणार असल्याचे त्यागी यांनी स्पष्ट केले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा