जम्मू-काश्मिरातील रियासी हल्ल्याची तपासणी एनआयएच्या हाती!

तपास सुरु

जम्मू-काश्मिरातील रियासी हल्ल्याची तपासणी एनआयएच्या हाती!

जम्मू-काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तपास आता राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) हाती घेतला आहे. तसेच या हल्ल्याप्रकरणी एनआयएने दहशतवाद्यांवर बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायदा यूपीए अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

९ जून रोजी बसवर झालेल्या दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १० जणांचा मृत्यू झाला होता तर ३० पेक्षा अधिक जण जखमी झाले होते. या हल्ल्याच्या निषेधार्थ देशभरात विहिंप आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून निषेध आंदोलन करण्यात आले होते. दरम्यान, यापूर्वी या हल्ल्याची तपासणी एनआयएकडे सोपवण्यात येणार असल्याची माहिती समोर आली होती. इंडिया टुडेच्या बातमीनुसार, अखेर या दहशतवादी हल्ल्याचा तपास केंद्रीय गृह मंत्रालयाने राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) सोपवला असून या घटनेमागे मोठा कट आहे का हे पाहण्यासाठी एनआयए या दहशतवादी हल्ल्याचा प्रत्येक कोनातून तपास करत आहे.

हे ही वाचा:

झारखंडच्या सिंगभूममध्ये चकमक, ४ नक्षलवादी ठार!

‘बळीं’च्या जनावरांच्या यादीत गायीचा समावेश!

मोदी-पोप भेटीच्या पोस्टवर काँग्रेसचा माफीनामा

जगातील सर्वांत उंच रेल्वेपुलावरून धावली ट्रेन!

दरम्यान, दहशतवादी हल्ल्याच्या चौकशीच्या संदर्भात जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी गेल्या आठवड्यात एकूण ५० संशयितांना ताब्यात घेतले होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच जम्मू-काश्मीर पोलिसांनी या हल्ल्यात सहभागी असलेल्या तीन दहशतवाद्यांपैकी एकाचे रेखाचित्र जारी केले आहे. त्याच्याबद्दल माहिती देणाऱ्यास २० लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर केले आहे.

Exit mobile version