27 C
Mumbai
Wednesday, November 20, 2024
घरविशेष'राष्ट्रहिताला प्राधान्य' देणाऱ्या तरुण पिढीचा विजय, अमित शहा !

‘राष्ट्रहिताला प्राधान्य’ देणाऱ्या तरुण पिढीचा विजय, अमित शहा !

दिल्ली विद्यापीठाच्या निवडणुकीत 'एबीव्हीपीच्या' मोठ्या विजयाने भाजपकडून कौतुक !

Google News Follow

Related

दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघ (डीयूएसयू) च्या निडवणुकीत ‘एबीव्हीपीचा मोठा विजय झाला आहे.अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि सहसचिव पदांसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी आज पार पडली यामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (एबीव्हीपी) चार सेंट्रल पॅनल पदांपैकी तीन पदांवर विजय मिळवत मोठा विजय मिळवला आहे.

दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघ (डीयूएसयू) च्या केंद्रीय पॅनेलच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि सहसचिव या पदांसाठी शनिवारी संध्याकाळी मतमोजणी झाली यामध्ये भाजप समर्थित आणि आरएसएस संलग्न असणारी विध्यार्थी संघटना विजयी झाली. विद्यार्थी संघटनेच्या विजयामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक भारतीय जनता पक्ष (भाजप) नेत्यांनी एबीव्हीपीच्या कामगिरीचे कौतुक केले असून शहा म्हणाले, अभाविपच्या विजयाच्या युवा पिढीने ‘राष्ट्रहिताला प्राधान्य’ दिल्याचे दिसून येते.”मला पूर्ण विश्वास आहे की, निवडून आलेले सदस्य स्वामी विवेकानंदांचे आदर्श आणि राष्ट्रवादाची भावना तरुणांमध्ये जिवंत ठेवण्यासाठी निर्धाराने काम करत राहतील, शाह यांनी ट्विट केले आहे.

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही अभाविपचे अभिनंदन केले. त्यांनी ट्विट केले, “एबीव्हीपीचे यश हे
सूचित करते की, देशातील तरुण एक मजबूत आणि विकसित भारत घडवण्यासाठी कटिबद्ध आहेत. विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांचे पुन्हा अभिनंदन.”भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा म्हणाले की, अभाविपचे विद्यार्थी हे स्वामी विवेकानंदांच्या आदर्शांनी प्रेरित आहेत.मिळालेला विजय हा तरुण पिढीच्या ‘राष्ट्र प्रथम’ या विचारधारणेशी निगडित आहे, जे उद्याच्या देशाला घडवणारे आहेत.

हे ही वाचा:

शरद पवारांनी केले अदानींच्या प्रकल्पाचे उद्घाटन

आईच्या मृत्यूनंतरही पोलिसाने कर्तव्य निभावले; पंतप्रधान झाले भावूक

स्लीप मोडवर असलेल्या प्रज्ञान, विक्रमशी संपर्क करण्याचा इस्रोचा प्रयत्न

स्लीप मोडवर असलेल्या प्रज्ञान, विक्रमशी संपर्क करण्याचा इस्रोचा प्रयत्न

दुसरीकडे केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी नॅशनल स्टुडंट्स युनियन (एनएसयूआय) ने अनेक पदे गमावल्याने काँग्रेसवर टीकास्त्र सोडले आहे.रिजिजू यांनी ट्विट केले की, “राहुल गांधींनी दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत प्रचार केला त्यामुळे एबीव्हीपीला विजयासाठी आपल्या मतांमध्ये वाढ करता आली.

त्यांनी एबीव्हीपी आणि एनएसयूआय या दोन्हींच्या होर्डिंगचा तुलना करणारा एक फोटो शेअर करत लिहिले, “रोल मॉडेल्स आणि आयडॉल्स हे संस्थेचे ओळख निर्माण करतात.एबीव्हीपीच्या होर्डिंगवर स्वामी विवेकानंदांचे चित्र होते, तर एनएसयूआयच्या होर्डिंगवर राहुल गांधींचे चित्र होते.डीयूएसयूची निवडणूक शुक्रवार, २२ सप्टेंबर रोजी झाली आणि त्याचा निकाल आज लागला.या निवडणुकीत चार पदांसाठी चोवीस उमेदवार रिंगणात होते.

डीयूएसयूच्या निवडणुकीत नॅशनल स्टुडंट्स युनियन (NSUI) चे उमेदवार हितेश गुलिया यांचा पराभव करत ABVP चे तुषार देढा यांनी अध्यक्षपदावर विजय मिळवला.तसेच सचिव आणि सहसचिव पदासाठी ABVPचे अपराजिता आणि सचिन बैसला यांनी विजय मिळवला आहे.अपराजिताने काँग्रेसशी संलग्न असलेल्या एनएसयूआयच्या यक्षना शर्मा यांचा १२,९३७ मतांच्या फरकाने पराभव केला, तर बैसला यांनी शुभम कुमार चौधरी यांचा ९,९९५ मतांच्या फरकाने पराभव केला.

दरम्यान, एनएसयूआयचे अभि दहिया उपाध्यक्षपदी विराजमान झाले आहेत. त्यांना २२,३३१ मते मिळाली आणि त्यांनी ABVP च्या सुशांत धनकर यांचा १,८२९ मतांच्या फरकाने पराभव केला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
192,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा