कोविड काळात हाय वे बांधणी सुसाट

कोविड काळात हाय वे बांधणी सुसाट

कोविडच्या महामारी काळात जिथे एकीकडे सर्व कारभार ठप्प होते, तिथे राष्ट्रीय महामार्गांच्या बांधकामांचा मात्र वेग वाढला आहे. भारताचे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी याविषयीची माहिती दिली आहे. २०२०-२१ या वर्षांत राष्ट्रीय महामार्ग बांधणीचा वेग प्रति दिवशी ३६.५ किलोमीटर इतका राहिला आहे. ही आजवरच्या इतिहासातील सर्वाधिक वेगाने होणारी रस्तेबांधणी आहे.

या कालखंडात भारताने जागतीक विक्रमही केला आहे. भारताने अवघ्या २४ तासांच्या कालावधीत २.५ किमी लांबीचा चौपदरी काँक्रीट रस्ता आणि २६ किलोमीटर लांबीचा एकपदरी डांबरी रस्ता केवळ २१ तासांत तयार केला आहे. बांधकामाचा हा वेग टिकविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले आहेत, ज्यात कंत्राटदारांना सहाय्य, कराराच्या तरतुदींमध्ये शिथिलता, उप कंत्राटदारांना थेट देय आणि बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांना अन्न व वैद्यकीय सुविधा याचा समावेश आहे.

हे ही वाचा:

भारताच्या ‘सारंग’ ची होणार रशियात हवा

पालिकेत हा कुठल्या ‘पेंग्विन गँग’चा भ्रष्टाचार सुरू आहे?

गणेशमूर्ती साकारणारे हात पुन्हा आर्थिक विवंचनेत

ठाण्यातील ‘छम छम’ मुळे दोन पोलिसांचे निलंबन, तर दोघांची बदली

या प्रकल्पांमध्ये गुणवत्ता नियंत्रण सुनिश्चित करण्यात आले आहे. त्यासाठी आयआरसीच्या सर्वोच्च माप दंडांनुसार आणि रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या वैशिष्ट्यांनुसार बांधकाम केले जात आहे. तर धोरणात्मक मार्गदर्शक तत्त्वे अद्ययावत करण्यासह तपासणी करण्यासाठी आणि गुणवत्तेनुसार प्रणाली सुधारणेशी संबंधित मार्गदर्शक तत्वे जारी करण्यासाठी गुणवत्ता नियंत्रण क्षेत्र स्थापन करण्यात आले आहे. नितीन गडकरी यांनी ट्विटरच्या माध्यमातून या संबंधी माहिती दिली आहे.

Exit mobile version