25 C
Mumbai
Saturday, November 23, 2024
घरविशेषतटरक्षक दलाने समुद्राखाली फडकवला तिरंगा

तटरक्षक दलाने समुद्राखाली फडकवला तिरंगा

Google News Follow

Related

लोकांच्या हृदयात देशभक्तीची भावना तसेच भारतीय राष्ट्रध्वजाबद्दल जागरूकता वाढवण्याच्यादृष्टीने देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ जुलै रोजी तिरंगा घरी आणण्यासाठी आणि तो फडकावण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी हर घर तिरंगा मोहीम सुरू केली.

लोकांच्या हृदयात देशभक्तीची भावना जागृत करणे आणि स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव लोकसहभागाच्या भावनेने साजरा करणे ही या उपक्रमामागील संकल्पना आहे. त्याचाच एक भाग म्हणून या केवळ घरा घरातच नाही तर भारतीय तटरक्षक दलाने थेट समुद्रात पाण्याच्या खालीच अभिमानाने तिरंगा फडकवला. या अनोख्या ध्वजारोहणाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होताना दिसत आहे.

या व्हिडीओमध्ये समुद्राखाली पाण्याच्या तरंगांमध्ये तिरंगा डौलाने फडकताना दिसत आहे. लोकांच्या हृदयात देशभक्तीची भावना जागृत करणे आणि भारतीय राष्ट्रध्वजाबद्दल जागरुकता वाढवणे हा या उपक्रमामागील संकल्पना असल्याचे आयसीजीच्या अधिकाऱ्याने सांगितले.

१३ ते १५ऑगस्ट दरम्यान देशभरात तिरंगा फडकणार

या मोहिमेंतर्गत देशभरात तिरंगा फडकवण्यात येणार आहे. त्यादृष्टीने विविध राज्यांमध्ये ध्वज तयार करण्यासाठी स्वयंसहाय्यता गटांची मदत घेतली जात आहे. स्थानिक पातळीवरील शिलाई युनिट आणि लघु व मध्यम उद्योगही या कामात सहभागी झाले आहेत. वस्त्रोद्योग मंत्रालयाने ध्वज उत्पादकांची ओळख पटवली आहे जे मोठ्या प्रमाणात ध्वज पुरवठा करतात. राज्ये, केंद्रशासित प्रदेश आणि मंत्रालये या मोहिमेत मोठ्या उत्साहाने सहभागी होत आहेत.

हे ही वाचा:

राज्यात दहीहंडीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी

बाळासाहेबांचे नातू निहार ठाकरे एकनाथ शिंदे यांच्या बाजूने

मराठा समाजाचे ईडब्ल्यूएस आरक्षण रद्द

राज्यपाल कोश्यारी यांच्या विधानावरून वाद

टपाल कार्यालये करणार ध्वजांची विक्री

संपूर्ण देशाची देशभक्ती आणि एकात्मता दर्शविण्यासाठी स्वातंत्र्यलढ्याशी संबंधित विविध ठिकाणी विविध स्तरातील लोकांचा सहभाग असलेले विविध कार्यक्रमही आयोजित केले जातील. भारतभर ध्वजांचा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी केंद्राने अनेक पावले उचलली आहेत. देशातील सर्व टपाल कार्यालये १ ऑगस्टपासून झेंड्यांची विक्री सुरू करणार आहेत. केंद्राने ध्वजांच्या पुरवठ्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी विविध ई-कॉमर्स वेबसाइट आणि स्वयं-मदत गटांशीही करार केला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा