23 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषसैन्यदिनानिमित्त लेहमध्ये जगातील सर्वात मोठा राष्ट्रध्वज

सैन्यदिनानिमित्त लेहमध्ये जगातील सर्वात मोठा राष्ट्रध्वज

Google News Follow

Related

देशात दरवर्षी १५ जानेवारीला आर्मी डे साजरा केला जातो. दरम्यान, लष्कर दिनानिमित्त आज राजस्थानमधील जैसलमेर येथे भारत-पाकिस्तान सीमेवर खादीपासून बनवलेला महाकाय राष्ट्रध्वज प्रदर्शित करण्यात आला. खादीपासून बनलेला हा जगातील सर्वात मोठा राष्ट्रध्वज आहे.

हा विशाल तिरंगा भारत-पाकिस्तान सीमेवर लोंगेवाला येथे प्रदर्शित केला जाईल.आणि त्यांनतर हा राष्ट्रध्वज लष्कर दिनानिमित्त जैसलमेर येथील सीमा चौकीवर प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. हा ध्वज २२५ फूट लांब आणि १५० फूट रुंद आणि सुमारे एक हजार ४०० किलो वजनाच्या विशाल तिरंग्याचे हे पाचवे सार्वजनिक प्रदर्शन असेल,असे मंत्रालयाने सांगितले.

हा ध्वज तयार करण्यासाठी ७० खादी कारागिरांना ४९ दिवस लागले. एकूण ३३ हजार ७५० चौरस फूट क्षेत्रफळ असलेला हा ध्वज तयार करण्यासाठी ४ हजार ५०० मीटर हाताने विणलेल्या खादी सूती ध्वजस्तंभाचा वापर करण्यात आला आहे. ध्वजातील अशोक चक्राचा व्यास ३० फूट आहे.

हे ही वाचा:

१६ जानेवारी आता ” राष्ट्रीय स्टार्ट-अप दिवस ”

किरण मानेंची हकालपट्टी व्यावसायिक कारणांमुळेच

पहिल्या तीन महिन्यात जाहिरातींसाठी राज्य सरकार खर्च करणार १६ कोटी

किरण मानेंची हकालपट्टी व्यावसायिक कारणांमुळेच

 

याआधी, २ ऑक्टोबर २०२१ रोजी लेहमध्ये तिरंग्याचे अनावरण करण्यात आले होते. यानंतर खादीने सार्वजनिक प्रदर्शनासाठी बनवलेला हा पाचवा ध्वज आहे. दुसरा तिरंगा वायुसेना दिनानिमित्त ८ ऑक्टोबर २०२१ रोजी हिंडन एअरबेसवर आणि २१ ऑक्टोबर २०२१ रोजी लाल किल्ल्यावर प्रदर्शित करण्यात आला. ४ डिसेंबर २०२१ रोजी नौदल दिन साजरा करण्यासाठी मुंबईतील गेटवे ऑफ इंडियाजवळील नेव्हल डॉकयार्डमध्ये राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘आझादी का अमृत महोत्सवा’अंतर्गत खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने हा तिरंगा तयार केला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा