शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर सावित्रीबाई फुले विद्यापीठात दोन दिवसांची राष्ट्रीय परिषद

अनेक इतिहास अभ्यासकांच्या व्याख्यानांची मेजवानी

शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर सावित्रीबाई फुले विद्यापीठात दोन दिवसांची राष्ट्रीय परिषद

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन व कार्याचे २१व्या शतकातील महत्त्व आणि समयोचितता या विषयावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजाभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ३० व ३१ ऑगस्ट या दोन दिवसांत ही राष्ट्रीय परिषद होणार असून त्यावेळी शिवाजी महाराजांसंदर्भात विविध विषयांवर व्याख्याने होणार आहेत.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे ३० ऑगस्टला उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी. प्रमुख मार्गदर्शन इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्सचे माजी अध्यक्ष तसेच माजी खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे करणार आहेत. या राष्ट्रीय परिषदेचे बीजभाषण ज्येष्ठ विचारवंत व अभ्यासक डॉ. सदानंद मोरे करणार आहेत.

३० ऑगस्टला सकाळी १० वाजता इरावती कर्वे समाजिक शास्त्र संकुल, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे.

दुसऱ्या दिवशी म्हणजेच ३१ ऑगस्टला या राष्ट्रीय परिषदेचा समारोप होणार असून त्यावेळी प्रमुख उपस्थिती असेल सहकार व नागरी हवाई वाहतूक खात्याचे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांची. त्यावेळी प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाचे माजी कुलगुरू तसेच इतिहास व मूर्तिशास्त्राचे अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर. अध्यक्ष भारत इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष प्रदीप रावत असतील.

हे ही वाचा:

कर्नाटक सरकारला दिव्यांच्या खांबावर असलेल्या धनु्ष्यबाण, गदेच्या प्रतिमा नकोशा!

इस्रायलने केला गेम! मशिदीत लपलेले पाच पॅलेस्टाइनी दहशदवादी ठार

गजा मारणेच्या हातून सत्कार स्वीकारताच चंद्रकांत पाटील बनले टीकेचे धनी

बंगळुरू विमानतळावर तरुणाची कुऱ्हाडीने वार करून हत्या

या कार्यक्रमाचे स्वरूप असे असेल-

३० ऑगस्ट रोजी राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन झाल्यानंतर नव्या सभागृहाचे उद्घाटन होईल आणि विशेष टपालतिकिटाचे प्रकाशन करण्यात येईल. त्यावेळी डेक्कन महाविद्यालय अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद पांडे, लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर, व्हाइस ऍडमिरल मुरलीधर पवार, एअर मार्शल भूषण गोखले यांची प्रमुख उपस्थिती असेल. दुपारच्या सत्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे सामरिक नेतृत्व, व्यवस्थापन व नेतृत्व कौशल्य, भारताच्या राष्ट्रीयत्त्वाची घडण, कृषी, महिला व धर्मविषयक धोरण, कल्याणकारी राज्य, स्वातंत्र्यलढ्यात उमटलेले प्रतिबिंब, साहित्यातून घडणारे दर्शन, एकविसाव्या शतकातील आकलन व प्रेरणा या विषयांवरील शोधनिबंधांचे सादरीकरण केले जाईल.

दुपारी इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांचे छत्रपती शिवाजी महाराजांची अष्टक्रांती या विषयावर व्याख्यान होईल. इये मराठीचिये नगरी हा मंदार परळीकर व सहकारी यांचा सांस्कृतिक कार्यक्रमही होईल.

त्यानंतर ३१ ऑगस्टला शोधनिबंधांचे दुसरे सत्रही होईल. दुपारी सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज रघुजीराजे आंग्रे यांच्या अध्यक्षतेखाली व्याख्याने होतील. त्यात सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज विक्रमसिंह मोहिते यांचे स्टेटक्राफ्ट ऑफ छत्रपती शिवाजी महाराज याविषयावर व्याख्यान होईल. तर शिवकालीन कागदपत्रांच्या अभ्यासाची पद्धती यावर डॉ. केदार फाळके यांचे व्याख्यान होईल.

सायंकाळी ४ ते ६ या वेळेत राष्ट्रीय परिषदेचा समारोप होणार आहे.

 

Exit mobile version