ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक विजेत्यांनी गायले राष्ट्रगान

ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक विजेत्यांनी गायले राष्ट्रगान

टोकियो ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताचे नाव मोठे करणारे हे सर्व खेळाडू आता नव्या भूमिकेत जनतेसमोर आले आहेत. पदक जिंकणाऱ्या या खेळाडूंनी २६ जानेवारीपूर्वी एकत्र येऊन राष्ट्रगीत गायले आहे. इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स मॅनेजमेंट चा (IISM) हा उपक्रम आहे. या सर्व खेळाडूंचा एक व्हिडिओ तयार करण्यात आला आहे. IISM ने २६ जानेवारीपूर्वी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर राष्ट्रगीताचा हा व्हिडीओ शेअर केला आहे.

नीरज चोप्रा, मीराबाई चानू, सुमीत अंतील, पीआर श्रीजेश, लवलिना बोरोघन, रवी कुमार दहिया, मनीष नरवाल, कृष्णा नगर, भावना पटेल, प्रमोद भगत, देवेंद्र झाझरिया, निषाद कुमार, योगेश कथुनिया, प्रवीण कुमार या खेळाडूंनी राष्ट्रगीत गायले आहे. सुहास यथीराज, शरद कुमार, हरविंदर सिंग आणि मनोक सरकार यांनीही राष्ट्रगीत गायले आहे. या सर्वांनी टोकियो येथे झालेल्या ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिकमध्ये वेगवेगळ्या खेळांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते.

“Jana Gana Mana” - Tokyo Olympic and Paralympic medallists | poem recited by Shri. Amitabh Bachchan

हे ही वाचा:

…म्हणून महाराष्ट्रातील चार मुलांना मिळाला राष्ट्रीय बाल पुरस्कार

दिल्ली सरकारचे तळीरामांसाठी घे दारू, घे दारू! फक्त ३ दिवसच ड्राय डे

देशविरोधी भाषण करणाऱ्या शर्जिल इमामविरोधात देशद्रोहाच्या खटल्याचे आदेश

‘मुंबई महापालिकेत भाजपचेच कमळ फुलणार’

ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावणारा नीरज चोप्रा याने हा व्हिडीओ ट्विट केला आहे. लोकांमध्ये खेळाविषयी जागरुकता वाढवणे हा या मागचा उद्देश आहे. IISM ने २०१६ मध्येही एक असा व्हिडीओ बनवला होता, ज्यामध्ये सचिन तेंडुलकर, सानिया मिर्झा, सुनील गावस्कर, महेश भूपती यांच्यासह अनेक खेळाडूंनी राष्ट्रगीत गायले होते.

Exit mobile version