आज २२ वा कारगिल विजय दिवस साजरा होत आहे. या दिनानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेकांनी हुतात्मा झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली. १९९९ मध्ये कारगिलच्या उंच शिखरांवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध झाले होते. ज्या युद्धात, तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींच्या शब्दात सांगायचं झालं तर, भारत एक हात मागे ठेऊन ते युद्ध लढला होता. तरीही भारताने या युद्धात विजय मिळवला होता.
कारगिल युद्ध ही भारताच्या इतिहातील एक महत्वाची घटना आहे. या युद्धात भारताने पाकिस्तानला चारी मुंड्या चित केलं आणि विजय मिळवला. कारगिल युद्धात भारताने मिळवलेला विजय ही पाकिस्तानची भळभळती जखम आहे. भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाचे स्मरण म्हणून २६ जुलैला ‘कारगिल विजय दिवस’ साजरा केला जातो.
१९९९ मध्ये कारगिलच्या उंच शिखरांवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध झाले होते. ज्यात भारताने विजय मिळवला होता. त्या युद्धाच्या विजयाच्या स्मरणार्थ कारगिल विजय दिवस दरवर्षी कारगिलच्या द्रास येथील युद्ध स्मारकात साजरा केला जातो. १९९९ मध्ये पाकिस्तानी सैन्याने भारताच्या या शिखरांवर घुसखोरी केली होती. १४ ते १८ हजार फूट उंचीवर असलेल्या या शिखरावरून भारतीय सैन्याने मोठ्या शौर्याने पाकिस्तानी घुसखोरांना पळवून लावलं होतं. या युद्धामध्ये आपले ५०० सैनिक शहीद झाले होते. हे युद्ध लष्करी इतिहासामध्ये एक अतिशय कठीण आणि धोकादायक युद्ध म्हणून ओळखले जाते.
पंतप्रधान मोदी यांनी काल मन की बातमध्ये म्हटलं होतं की, २६ जुलै रोजी, ‘कारगिल विजय दिवस’ आहे. कारगिलचे युद्ध भारतीय सैन्याच्या शौर्य आणि संयमाचे असे प्रतीक आहे, जे संपूर्ण जगाने पहिले आहे. यावर्षी हा गौरवास्पद दिवस देखील अमृत महोत्सवाच्या दरम्यान साजरा केला जाणार आहे, असं ते म्हणाले.
हे ही वाचा:
निकषांचा विचार न करता तातडीची मदत जाहीर करा
जनता तुमचो ह्यो माज उतरवल्या शिवाय रव्हची नाय!
मदतीची याचना करणाऱ्या महिलेवर भास्कर जाधवांची अरेरावी
आमदार खासदारांचा पगार इथे वळवा, पण आम्हाला मदत करा!
देशाचे राष्ट्रपती आणि सशस्त्र सैन्याचे सर्वोच्च कमांडर रामनाथ कोविंद आज द्रासमधील कारगिल वॉर मेमोरियल येथे शहीद जवानांना श्रद्धांजली वाहणार होते. मात्र खराब वातावरणामुळं हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. राष्ट्रपती कोविंद गुलमर्गला जात आहेत तिथं ते जवानांशी संवाद करतील.