‘नासिरुद्दीन यांच्या फार्महाऊसवर पुरस्काराची ट्रॉफी बनली बाथरूमचे हँडल

अभिनेते नासिरुद्दीन शाह यांची टिप्पणी; अमूक हा वर्षातील सर्वोत्कृष्ट अभिनेता आहे’ अशी कशी काय निवड केली जाऊ शकते?’

‘नासिरुद्दीन यांच्या फार्महाऊसवर पुरस्काराची ट्रॉफी बनली बाथरूमचे हँडल

ज्येष्ठ अभिनेते नासिरुद्दीन शाह यांनी ‘स्पर्धात्मक पुरस्कार आपण सहन करू शकत नाही. त्यांच्या ट्रॉफी मी माझ्या फार्महाऊसच्या बाथरूमच्या हँडल म्हणून वापरतो,’ अशा शब्दांत या पुरस्कारांची निर्भत्सना केली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी हा खुलासा केला.

गेल्या काही दिवसांपासून नासिरुद्दीन शाह त्यांच्या विधानांमुळे चर्चेत आहेत. ते नेहमीच त्यांना जे वाटते, त्याबदद्ल मोकळेपणाने मत व्यक्त करत असतात. यावेळी त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत स्पर्धात्मक पुरस्कारांच्या निरर्थकतेबद्दल खुलासा केला आहे. किंबहुना, त्यांनी असाही दावाही केला की, त्यांनी फिल्मफेअर पुरस्कारांचा वापर त्यांच्या फार्महाऊसच्या वॉशरूममध्ये दरवाजाच्या हँडल म्हणून केला आहे.

हे ही वाचा:

बिहारमध्ये बांधकाम सुरू असलेला पूल कोसळला

‘महाभारत’ मालिकेत शकुनी मामाची भूमिका साकारणारे गुफी पेंटल काळाच्या पडद्याआड

प्रयागराजमध्ये महिला पोलिसालाच बसला ‘लव्ह जिहाद’चा फटका

१५ मिनिटांत एटीएम फोडून १९ लाख चोरून पसार

ते म्हणाले, ‘कोणताही अभिनेता ज्याने भूमिका साकारण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले आहे आणि अपार मेहनत घेतली आहे, तो चांगला अभिनेता असतो. मात्र तुम्ही या साऱ्यांतून केवळ एकाचीच ‘हा वर्षातील सर्वोत्कृष्ट अभिनेता आहे’ अशी कशी काय निवड करू शकता? ते कसे काय योग्य आहे?’, असा प्रश्न विचारला. ‘मला त्या पुरस्कारांचा अभिमान नाही. मला मिळालेले शेवटचे दोन पुरस्कार घेण्यासाठीही मी गेलो नाही. म्हणून, जेव्हा मी फार्महाऊस बांधले तेव्हा हे पुरस्कार तिथे ठेवायचे ठरवले. जो कोणी वॉशरूममध्ये जाईल त्याला प्रत्येकी दोन पुरस्कार मिळतील, कारण मी वॉशरूमचे हँडल म्हणून फिल्मफेअर पुरस्कार ठेवले आहेत,’ असे ते म्हणाले.

“मला या ट्रॉफींमध्ये काहीही मूल्य वाटत नाही. सुरुवातीला या ट्रॉफि मिळाल्या, तेव्हा मला आनंद झाला. पण नंतर माझ्याकडे ट्रॉफींचा ढीग साचू लागला. त्यानंतर लगेचच मला समजले की, हे पुरस्कार लॉबिंगमुळे मिळतात. एखाद्याला हे पुरस्कार त्यांच्या गुणवत्तेमुळेच मिळतीलच असे नाही,’ अशीही टीका त्यांनी केली.
असे असले तरी भारत सरकारकडून पद्म पुरस्कारांबाबत त्यांनी आदराची भावना व्यक्त केली. ‘जेव्हा मला पद्मश्री आणि पद्मभूषण मिळाले, तेव्हा मला माझ्या दिवंगत वडिलांची आठवण झाली. त्यांना नेहमी माझ्या नोकरीबद्दल काळजी असायची. तू जर हे निरुपयोगी काम केलेस तर तुझ्यासारखा मूर्ख तूच, असे ते मला म्हणत. त्यामुळे जेव्हा मी पुरस्कार घेण्यासाठी राष्ट्रपती भवनात गेलो, तेव्हा मी वर पाहिले आणि माझ्या वडिलांना विचारले की, ते हे सर्व पाहात आहेत का? ते तेव्हा तिथे होते आणि मला खात्री आहे की ते आनंदी आहेत. मला पुरस्कार मिळाल्याचा त्यांना आनंद झाला होता. मात्र मी हे स्पर्धात्मक पुरस्कार सहन करू शकत नाही,’ असे त्यांनी स्पष्ट केले.

Exit mobile version