नाशिक मनपाच्या रुग्णालयातून ऑक्सिजनची गळतीच्या घटनेमुळे सारा देश हादरला आहे. त्यावरून विविध नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा समावेश आहे. त्याबरोबरच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
हे ही वाचा:
नाशिकमध्ये ऑक्सिजन गळतीचा भयंकर प्रकार; रुग्ण दगावल्याची भीती
नाशिकमध्ये ऑक्सिजन गळतीची भयंकर घटना, २२ रुग्णांचा तडफडून मृत्यू
सिरम इन्स्टिट्युटकडून लसींची किंमत जाहिर
गजा मारणे प्रकरणात माजी खासदार संजय काकडेंना अटक
नाशिक मनपाच्या रुग्णालयात ऑक्सिजनची गळती झाल्यामुळे २२ रुग्णांचा मृत्यु झाला आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणाबाबत ट्वीट केले असून त्यात, दुर्दैवी मृत्यु झालेल्या सर्वांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्याबरोबरच ही घटना अत्यंत हृदयद्रावक असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.
The tragedy at a hospital in Nashik because of oxygen tank leakage is heart-wrenching. Anguished by the loss of lives due to it. Condolences to the bereaved families in this sad hour.
— Narendra Modi (@narendramodi) April 21, 2021
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील ट्वीटरवरून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी या प्रकरणात मृत्युमुखी पडलेल्यांप्रती संवेदना व्यक्त करताना इतर रुग्णांच्या कुशल आरोग्यासाठी प्रार्थना देखील केली आहे.
नासिक के एक अस्पताल में ऑक्सिजन लीक होने से हुई दुर्घटना का समाचार सुन व्यथित हूँ। इस हादसे में जिन लोगों ने अपनों को खोया है उनकी इस अपूरणीय क्षति पर अपनी गहरी संवेदनाएं व्यक्त करता हूँ। बाकी सभी मरीजों की कुशलता के लिए ईश्वर से प्रार्थना करता हूँ।
— Amit Shah (@AmitShah) April 21, 2021
रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी देखील ट्वीटरचा आधार घेत आपले दुःख व्यक्त केले आहे. त्याबरोबरच त्यांनी मृत्युमुखी पडलेल्यांच्या मित्रांना आणि नातेवाईकांना देवाने हे दुःख सहन करण्याची शक्ती द्यावी अशी प्रार्थना केली आहे.
नासिक के हॉस्पिटल में ऑक्सीजन लीक होने व उसके कारण मरीजों की मृत्यु पर अत्यंत दुख पहुंचा है।
मेरी संवेदनायें, उनके परिजनों और मित्रों के साथ हैं, ईश्वर से प्रार्थना है कि इस कठिन घड़ी में उन्हें यह अपार दुख सहन करने की शक्ति दें।
— Piyush Goyal (@PiyushGoyal) April 21, 2021
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माध्यमांकडे प्रतिक्रिया दिली होती. त्यांनी देखील यात प्राण गमावलेल्यांच्या नातेवाईकांना हे दुःख सहन करण्याची शक्ती लाभो अशी प्रार्थना केली आहे. त्याबरोबरच या घटनेची सखोल चौकशी तर करावीच, परंतु त्यासोबतच भविष्यात अन्यत्र कुठे अशी घटना घडू नये यासाठी काळजी घेण्याची विनंती देखील केली आहे. त्यासोबतच त्यांनी गरजूंना मदत उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
प्रशासनाने आता तत्काळ गरजूंना मदत उपलब्ध करून देण्याचे काम केले पाहिजे. या घटनेची सखोल चौकशी तर होईलच. पण भविष्यात अन्यत्र कुठे अशा घटना घडणार नाहीत, यादृष्टीने खबरदारी घेतली पाहिजे.#Nashik #NashikTragedy #oxygenleak
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 21, 2021
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या घटनेबाबत एक व्हिडिओ प्रसृत केला आहे. ज्यात त्यांनी पुर्वी रुग्णालयात घडलेल्या अपघातांचा संदर्भ देत, या सर्वांची चौकशी झाली पाहिजे असे मत व्यक्त केले आहे.
भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी देखील ट्वीटरवरून या प्रकरणात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली तर वाहिली आहेच, परंतु या घटलेना मायनर म्हणणाऱ्या आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यावर टीका देखील केली आहे. त्यात त्यांनी राजेश टोपे यांना असंवेदनशील म्हटले आहे.
ठाकरे सरकार लोकांचे आणखी किती तळतळाट घेणार???
नाशिकमधील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळतीमुळे मृत्यू पावलेल्या ११ रुग्णांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🌷🌷— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) April 21, 2021
ऑक्सीजन गळतीमुळे २२ रुग्णांचे तडफडून मृत्यू झालेले असताना आरोग्यमंत्र्यांना मात्र ऑक्सिजन गळती लगेच थांबवल्यामुळे ऑक्सिजन फार वाया गेला नाही ही "मायनर" अर्थात किरकोळ घटना वाटते. राज्याचा आरोग्यमंत्री इतका संवेदनहीन असू शकतो? pic.twitter.com/fVIoTDhcbf
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) April 21, 2021