नाशिकच्या करन्सी नोट प्रेसला आग!

नाशिकच्या करन्सी नोट प्रेसला आग!

आज, ३१ मार्चला नाशिकच्या करन्सी नोट प्रेसला दुपारी साडे बाराच्या सुमारास अचानक आग लागली. ही आग करन्सी नोट प्रेस च्या आवारात लागल्याने सुदैवाने मोठी वित्तहानी टळली आहे. नोट प्रेसच्या मागील बाजूस असलेल्या गोदामाच्या परिसरातील गवताला आग लागली, ह्या आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले.

आग लागून काही तास उलटून गेले तरी ही आग आटोक्यात येत नाही आहे. अग्निशामक दलाच्या जवानांचे आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या आगीमुळे नोट प्रेसच्या आवारात असलेला कच्चा माल तसेच कचरा आगीत जळून खाग झाला झाला आहे. प्रसिद्धी माध्यमांचे प्रतिनिधींना प्रेसच्या आवारात जाण्यास परवानगी नसल्यामुळे नेमका काय प्रकार झाला याविषयी स्पष्ट माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही.

या आगीत वित्तहानी आणि मालमत्तेचे किती नुकसान झाले, याविषयी प्रशासनाने अधिकृत माहिती दिलेली नाही. आग आटोक्यात आणण्याचे अग्निशामक दलाचे प्रयन्त सुरु आहेत.

हे ही वाचा:

‘भविष्यात नाना पटोले यांच्यावर ईडीच्या धाडी पडल्या तरी आश्चर्य वाटणार नाही’

‘नवाज शरीफ यांनीच भारताला अजमल कसाबचा पत्ता दिला’

पाच तासांच्या तपासानंतर सतीश उकेंना ईडीने घेतलं ताब्यात

‘अन्य सदस्यांनी निवृत्त होणाऱ्या सदस्यांच्या अनुभवाचा लाभ घ्यावा’

नाशिकमध्ये सिक्युरिटी नोट प्रेसची स्थापना १९२४ मध्ये ब्रिटिशांनी केली होती. १९२८ मध्ये पहिल्यांदा पाच रुपयांची नोट या नोट प्रेसमध्ये छापण्यात आली. करन्सी नोट प्रेसमध्ये पाच,दहा,वीस,पन्नास, शंभर, दोनशे, पाचशे रुपयांच्या नोटा छापल्या जातात. या ठिकाणी वर्षाला सरासरी चार हजार दशलक्ष नोटा छापल्या जातात. त्यामुळे हे ठिकाणी सर्वच बाबतीत अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते. तसेच हे ठिकाण भारतातील अतिसंवेदनशील ठिकाण मानले जाते.

Exit mobile version