इंग्रजांविरुद्ध बंड पुकारण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी नाशिकमधील तरुणांना एकत्र करून ‘अभिनव भारत’ हे सशस्त्र लढ्याचे केंद्र स्थापन केले होते. भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाल्यावर १९५२ साली स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अभिनव भारतसह आणखी तीन संस्था विसर्जित केल्या होत्या. पण तरीही आजसुद्धा नाशिकच्या तिळभांडेश्वर लेन येथे अभिनव भारत मंदिर हे स्वातंत्र्यवीरांच्या इतिहासाची साक्ष देत आज सुद्धा उभे आहे.
आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांची पुण्यतिथी आहे. नाशिकच्या भगूर येथे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी इंग्रजांविरुद्धच्या लढ्यासाठी भगूर हेच केंद्र बनवले होते. भारतातील पहिली सशस्त्र क्रांतिकारी संघटना हि ‘अभिनव भारत’ भगूर इथेच स्थापन करण्यात आली होती. नोव्हेंबर १८९९ मध्ये आपल्या वयाच्या सोळाव्या वर्षी स्वातंत्र्यवीरांनी नाशिक येथे म्हसकर आणि पागे या दोन राष्ट्रभक्तांना घेऊन समूहाची स्थापना केली.
एक जानेवारी १९०० यादिवशी ‘मित्रमेळा’ हा समूह स्थापन करण्यात आला. तर १९०४ मध्ये याच संघटनेचे नामकरण ‘अभिनव भारत’ असे करण्यात आले होते. या संघटनेत अनेक तरुण स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होण्यासाठी सामील झाले तर, या समूहाची व्याप्ती युरोपपर्यंत पोचली होती.
हे ही वाचा:
सीमेंट, फायबर विटांखालून आणली जात होती दारू
पुढल्या वर्षांपासून मेट्रो नऊ सुरु होणार
कसबा, पिंपरी-चिंचवड पोटनिवडणूक मतदानास सुरवात
ठाकरे, नवाझुद्दीनच्या भेटीचे ‘राज’ ?
स्वातंत्र्यवीरांचे भाऊ बाबाराव तथा गणेश दामोदर सावरकर, कनिष्ठ बंधू नारायण दामोदर सावरकर, मदनलाल धिंग्रा असे अनेक क्रांतिकारी तरुण यात सहभागी झाले होते. याच संघटनेतील अनंत कान्हेरे यांनी जॅकन्सचा, लंडन मध्ये कर्झन वायलीचा वध केला होता. ‘अभिनव भारत’मुळे त्यावेळेस राष्ट्रप्रेमाची ज्योत जागवण्याचे काम केले होते.भारताचे स्वातंत्र्य मिळाल्यावर १९५२ साली हि संस्था पुण्यांत भव्य सभा घेऊन विसर्जित करण्यात आली होती. पण या संस्थेची वास्तू हि आजसुद्धा नाशिक मध्ये तिळभांडेश्वर लेन येथे इतिहासाची साक्ष देत उभी आहे.
नाशिकमधल्या तिळभांडेश्वर लेनमधील ‘अभिनव भारत’ या संस्थेचे कार्यालय म्हणून ओळख असलेला हा वाडा मिळवण्यासाठी अनेकांना झगडावे लागले होते. शेवटी लोकांकडून वर्गणी काढून हा वाद मिटवण्यात यश आले. शासनाकडून कोणतेही पैसे न घेता हा वाडा लोकसहभागाने वर्गणी काढून मिळवला होता. या मध्ये महाबळ गुरुजी, वर्तक, भट, दातार, केतकर यासर्व लोकांनी निधी संकलनाचे काम केले होते. आणि महत्वाचे म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अनेक ठिकाणी व्याख्याने देऊन निधी जमवण्यात आला आणि तो या वाड्याच्या खरेदीसाठी दिला असल्याचे सांगण्यात येते.