26 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरविशेषमागासवर्गीय तरुणानेच लिहिले नाशिकमधील ते पत्रक !

मागासवर्गीय तरुणानेच लिहिले नाशिकमधील ते पत्रक !

आरोपीला अटक

Google News Follow

Related

नाशिकमध्ये एका समाजाला उद्देशून आक्षेपार्ह पत्रक व्हायरल केल्याप्रकरणी एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. आक्षेपार्ह पत्रक झाल्यानंतर नाशिकच्या राजवाडा परिसरात शनिवारी (२२ जून) काही काळ वेळ तणाव निर्माण झाला होता. यावेळी नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्याबाहेर दलित समाजाकडून आंदोलन करण्यात आले होते. मात्र, आरोपीच्या कबुलीनंतर या प्रकरणाने एक वेगळ वळण घेतल्याचे पाहायला मिळाले आहे.

राजवाडा परिसरात हिंदू युवा वाहिनीच्या लेटर हेडवर एका समाजाविरुद्ध आक्षेपार्ह मजकूर प्रिंट करून ते पत्रक परिसरात ठिकठिकाणी टाकण्यात आले होते. यावरून संतप्त झालेल्या नागरिकांनी राजवाड्यातील १०० ते १५० नागरिकांनी मोर्चा काढत घोषणाबाजी केली आणि पंचवटी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या मांडला.

या प्रकरणाचा उलगडा झाला असून या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी नागरिकांना सांगितले. आक्षेपार्ह पत्रकावर ज्या व्यक्तीचा फोटो छापण्यात आला आहे, त्याच्या कुटुंबियांना त्रास देण्यासाठी त्याला धडा शिकवण्यासाठी आरोपीने अशा प्रकारचे आक्षेपार्ह पत्रक प्रिंटकरून सर्वत्र टाकण्यात आल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाल्याचे डीसीपी किरणकुमार चव्हाण यांनी सांगितले.

हे ही वाचा:

महिला कॉन्स्टेबलसोबतची लगट भोवली!

अरविंद केजरीवाल यांचे वजन घटू लागले !

‘सामना’च्या कार्यालयाबाहेर संजय राऊतांना बॅनरमधून आव्हान!

लैंगिक अत्याचार प्रकरणी प्रज्वल रेवण्णाच्या भावालाही अटक!

या संदर्भात माहिती देताना डीसीपी किरणकुमार चव्हाण यांनी सांगितले की, राजवाडा परिसरात ठिकठिकाणी आक्षेपार्ह मजकूर असलेले पत्रक टाकण्यात आले होते. या प्रकरणी तपासणी करून मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या वस्तूंवरून त्यानेच हे केल्याचे उघड झाले आहे. मुख्य म्हणजे आरोपीने ज्या संस्थेचे नाव वापरून लेटर हेडवर छापण्यात आले होते, ती संस्था सध्या अस्तित्वात नाही.

साधरणतः तीन-चार वर्षांपूर्वीचं ही संस्थेला बरखास्त करण्यात आली आहे. हे खोटं पत्र तयार करून वयक्तिक कारणातून एका कुटुंबाला त्रास व्हावा या उद्देशाने आरोपीने हे कृत्य केल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. हे सर्व प्रेम प्रकरणातून घडल्याचे तपासात दिसून आल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन देखील पोलिसांकडून करण्यात आले आहे.

चार मोबाईल आणि दोन लॅपटॉप जप्त
यासंदर्भात उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आरोपीला अटक करण्यात आले असून त्याच्याकडून चार मोबाईल आणि दोन लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत. त्यामुळे अन्य कोणी त्याच्या पाठीशी आहेत का? दंगल घडवण्यासाठी हे पत्रक काढण्यात आले होते का? याचा शोध पोलीस घेत आहे. ज्याने हे पत्र प्रकाशित केले होते तो दलित समाजाचा असल्याची माहिती उपमुख्यमंत्री फडणवीसांनी दिली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा