26 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरविशेषपाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या टोल कर्मचाऱ्याला घेतले ताब्यात !

पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या टोल कर्मचाऱ्याला घेतले ताब्यात !

नाशिक येथे टोलनाक्यावर केले कृत्य

Google News Follow

Related

नाशिक जिल्ह्यातील चांदवड शहर परिसरात टोल नाक्यावरील कर्मचाऱ्याने पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या होत्या. या प्रकरणी संबंधित कर्मचाऱ्यास तातडीने पोलिसांनी ताब्यात घेतले असून टोलनाका व्यवस्थापकाकडून कर्मचाऱ्यास निलंबित करण्यात आले आहे.

काल देशभरात स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अशातच नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथील मंगरूळ टोलनाक्यावर काम करण्याऱ्या एका कर्मचाऱ्याने पाकिस्तान जिंदाबादचे नारे दिल्याची घटना घडली.त्यामुळे त्याच्यासोबत टोलनाक्यावर काम करत असलेल्या इतर कर्मचाऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले.याबाबत स्थानिकांनी पोलिसांना बोलावून या घटनेची माहिती दिली.त्यानंतर टोल प्रशासनाने संबंधित कर्मचाऱ्यास तात्काळ निलंबित केले आहे.

शेहबाज कुरेशी असे या कर्मचाऱ्याचे नाव असून याने पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या होत्या. मंगरूळ येथील टोलनाक्यावरील व्यवस्थापक मनोज पवार यांनी शेहबाज या कर्मचाऱ्यास निलंबित कल्याचे सांगितले आहे.या प्रकरणी घोषणा देणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेत त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

हे ही वाचा:

विनयभंग प्रकरणी स्वयंघोषित राष्ट्रसंत एकनाथ लोमटेला अटक !

वांद्रे रेल्वे स्थानकाबाहेर लव्ह जिहादच्या संशयावरून तरुणाला मारहाण

चांद्रयानाचा चंद्राच्या शेवटच्या कक्षेत यशस्वी प्रवेश

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची राम कथेला हजेरी

पुण्यातही पाकिस्तान जिंदाबादची नारेबाजी
पुण्यातील कोंढवा परिसरात एका शाळेचे बांधकाम सुरू असताना सुरक्षा रक्षक म्हणून काम पाहणाऱ्या दोघांनी पाकिस्तान जिंदाबादचे नारे दिल्याची घटना घडली. काही नागरिकांनी घटनेची माहिती दिली. दरम्यान झाल्या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर कोंढवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पाकिस्तान जिंदाबादचे नारे देणाऱ्या या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटकही केली आहे.तसेच

स्वातंत्र्यदिनाच्या एक दिवस आधी पुण्यात म्युझिकल कॉन्सर्ट दरम्यान तिरंगा प्रेक्षकांमध्ये भिरकावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. क्लबमध्ये गायिका उमा शांती उर्फ शांती पीपल हिने नाचता-नाचता थेट तिरंगा भिरकावला. यानंतर पोलिसांनी या घटनेची दखल घेऊन तिच्यावर गुन्हा दाखल करत कारवाई केली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला, यामध्ये गायिका स्टेजवर डान्स करत असताना दोन्ही हातात तिरंगा घेऊन प्रेक्षकात फेकल्याचे दिसत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा