धुळ्याचे माजी नगरसेवक किरण अहिरराव यांचे कार अपघातात निधन !

चांदवडजवळ कार कंटेनर धडकले

धुळ्याचे माजी नगरसेवक किरण अहिरराव यांचे कार अपघातात निधन !

नाशिकच्या चांदवडजवळ कार -कंटेनरचा भीषण अपघात झाला असून या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे.या अपघातात धुळ्याच्या माजी नगरसेवक किरण अहिरराव यांचा समावेश आहे. सर्व मृत प्रवासी हे धुळ्यातील रहिवासी आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी सात वाजेच्या सुमारास चांदवडजवळील नमोकार तीर्थक्षेत्रा समोरील मुंबई-आग्रा महामार्गावर हा भीषण अपघात झाला. या अपघातात धुळ्याचे भाजपचे माजी नगरसेवक किरण अहिरराव यांच्या समवेत चौघांचा जागीच मृत्यू झाला. किरण हरीचंद्र अहिराव, अनिल विष्णू पाटील, कृष्णकांत चिंधा माळी, प्रवीण मधुकर पवार अशी या अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. अपघात घडल्यानंतर सोमा टोल वेज कंपनीचे पथक आणि पोलिस अपघातस्थळी दाखल झाले.पोलिसांनी चौघांचेही मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात आणले.या अपघातानंतर पोलिसांनी कंटेनरचालकाला ताब्यात घेतले आहे.

हे ही वाचा:

बेस्ट बसमध्ये पैसे विसरणारे प्रवासी वाढले; चार वर्षांत ८ हजार छत्र्याही लोक विसरले

भारताने आठव्यांदा जिंकला आशिया चषक

‘इंडी’ आघाडी पत्रकारांवरील बहिष्कार मागे घेणार?

संगीत नाटक अकादमी अमृत पुरस्काराने महाराष्ट्रातील सात कलावंतांना सन्मान

कार आणि कंटेनरची समोरासमोर धडक
दरम्यान धुळे येथील चार प्रवाशी कारमधून नाशिकहून धुळ्याकडे चालले होते. दरम्यान सकाळी सात वाजेच्या सुमारास चांदवडजवळ आले असता नमोकर तीर्थजवळ कार आणि कंटेनरची समोरासमोर धडक झाली. यात धुळे येथील चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. यात धुळ्यातील नगरसेवक किरण अहिरराव यांचा समावेश आहे. मात्र इतर मृतांची अद्याप ओळख होऊ शकलेली नाही. अपघात घडल्यानंतर सोमा टोल वेज कंपनीचे पथक आणि पोलीस अपघातस्थळी दाखल झाले. या अपघातानंतर काही वेळ महामार्ग ठप्प झाला होता.

Exit mobile version