६४३ कोटी किलोमीटर अंतर पार करून लघुग्रहाचा तुकडा घेऊन नासाचे कॅप्सूल पृथ्वीवर

अंतराळ क्षेत्रातील मोठी उपलब्धी

६४३ कोटी किलोमीटर अंतर पार करून लघुग्रहाचा तुकडा घेऊन नासाचे कॅप्सूल पृथ्वीवर

अमेरिकेची अंतराळ संस्था नासाकडून अंतराळात पाठविण्यात आलेले एक कॅप्सूल रविवार, २४ सप्टेंबर रोजी पृथ्वीवर परत आले. लघुग्रहाचे (asteroid) नमुने आणण्यासाठी हे कॅप्सूल पाठविण्यात आले होते. तब्बल ६४३ कोटी किलोमीटर अंतर पार करुन नासाचे कॅप्सुल पृथ्वीवर परतले आहे. अंतराळ क्षेत्रातील ही मोठी उपलब्धी मानली जात आहे.

२४ सप्टेंबर २०२३ रोजी भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता कॅप्सूल अमेरिकेच्या उटाहतील ग्रेट सॉल्ट लेक वाळवंटात उराविण्यात आले. लाघुग्रहावरील माती घेऊन हे कॅप्सुल पृथ्वीवर उतरले. हा लघुग्रह १५९ वर्षांनी म्हणजेचं २४ सप्टेंबर २१८२ रोजी पृथ्वीवर आदळणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या लघुग्रहाला शास्त्रज्ञांनी ‘बेनू’ असे नाव दिले आहे. या लाघुग्रहामुळे पृथ्वीवर मोठे नुकसान होणार असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळेच नासाने OSIRIS-ReX म्हणजेच Origins, Spectral Interpretation, Resource Identification and Security Rigolith Explorer ही मोहिम आखली होती.

लघुग्रह किती मजबूत आहे शिवाय किती घातक आहे याचा अभ्यास करता यावा यासाठी एका यानाला त्यावरील मातीचे नमुने मिळवण्यासाठी अवकाशात पाठवण्यात आले होते. मातीचे नमुने घेऊन हे कॅप्सूल आता पृथ्वीवर आले आहे. लघुग्रहाला अवकाशातच मिसाईलने उडवण्याची नासाची योजना आहे. कॅप्सुल हे एका छोट्या फ्रिजच्या आकाराचे असून अशाप्रकारची ही पहिलीचं मोहिम होती. ४५ किलोच्या या कॅप्सूलमध्ये २५० ग्रॅम मातीचा नमुना आहे. सात वर्षांपूर्वी हे कॅप्सूल अंतराळात पाठविण्यात आले होते. नासाच्या पथकाने हे कॅप्सूल ताब्यात घेतले असून आता त्यावर पुढील संशोधन केले जाईल.

हे ही वाचा:

कैसमीच्या भारतीय संगीत प्रेमाची पंतप्रधानांनी घेतली दखल

चांद्रयान ३, जी-२० परिषदेने भारताला शिखरावर नेले!

भारताची पहिल्या दिवशी दमदार कामगिरी, ५ पदकांची कमाई

भारताच्या जी-२० अध्यक्षपदाची संयुक्त राष्ट्रांकडून स्तुती !

OSIRIS-Rex मोहीम काय आहे?

पृथ्वीवर धडणारा लघुग्रह पृथ्वीसाठी किती धोकादायक ठरू शकतो याचा अभ्यास करमारे नासाचे हे पहिले मिशन आहे. याला OSIRIS-REx मिशन असे नाव देण्यात आले आहे. बेन्नू लघुग्रहाचा अभ्यास करण्यासाठी सात वर्षांपूर्वी मिशन लाँच करण्यात आले होते. तीन वर्षांपूर्वी Bennu लघुग्रहा नमुने गोळा केले होते. तेव्हापासून हे कॅप्सुल पृथ्वीच्या दिशेने परतत होते.

Exit mobile version