28 C
Mumbai
Friday, October 4, 2024
घरविशेषइस्रायलने नसरल्लाला मारले; भारतासमोर पाकमधील अतिरेक्यांचा मुद्दा

इस्रायलने नसरल्लाला मारले; भारतासमोर पाकमधील अतिरेक्यांचा मुद्दा

Google News Follow

Related

“इस्राएलच्या हल्ल्यात हिजबोल्लाचा प्रमुख नसरल्ला ठार” – ही बातमी वाचल्यावर कोणाही देशप्रेमी भारतीयाच्या मनात इथे आपल्या देशात असंख्य दहशतवादी हल्ले करून पाकिस्तानात आश्रयाला राहिलेल्या अतिरेक्यांचा विचार आल्याशिवाय राहणार नाही. यापैकी अगदी निर्विवादपणे सर्वात जुना फरार गुन्हेगार अर्थात १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील सूत्रधार दाऊद इब्राहीम. पण त्यानंतरही गेली अनेक वर्षे भारतात दहशतवादी हल्ल्यांची शृंखला सुरूच आहे आणि त्यापैकी बहुतांश हल्ले पाकिस्तानातून सूत्रसंचालित किंवा प्रत्यक्ष पाक पुरस्कृत हल्लेखोरांनी घडवलेले होते. अशा प्रत्येक बाबतीत, पाक सरकारला अनेकदा ठोस पुराव्यांसह अशा गुन्हेगारांना आमच्या हवाली करावे, अशा विनंत्या सुद्धा करून झाल्या आहेत. पण पाकिस्तानकडून प्रतिसाद शून्य राहिला आहे. पाकिस्तानात राहिलेले हे दहशतवादी आमच्या देशाचे गुन्हेगार असून, ते जर आमच्या ताब्यात दिले जात नसतील, तर त्यांना ते जिथे कुठे असतील, तिथे शिक्षा करण्याचा आम्हाला पूर्ण न्याय्य हक्क आहे. इस्राएल अशाच तऱ्हेने त्यांचा न्याय्य हक्क बजावीत आहे. आपण इस्रायेलचे या बाबतीत अनुकरण करणे निश्चितच योग्य होईल. आपण या बाबतीतली मुख्य वस्तुस्थिती जाणून घेऊ.

पाकिस्तान हा खालील कुख्यात आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांचा उघड आश्रयदाता असल्याचे सर्वज्ञात आहे. अल कायदा २. लष्करे ओमार ३. लष्करे तैबा (LeT) ४. जैश ए मोहम्मद ५. सिपाह ए साहबा ६. जैश उल अदल ७. अल बद्र मुजाहिदीन ८. हरकत उल मुजाहिदीन ९. इसिस के पी (ISIS-KP) जून २००९ मध्ये, भारताचे लष्करप्रमुख जनरल दीपक कपूर यांनी अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जिम जोन्स यांच्याशी झालेल्या चर्चेत असा ठोस दावा केला होता, की पाकिस्तानात किमान ४३ अशा छावण्या आहेत, जिथे अतिरेक्यांना प्रशिक्षण दिले जाते. जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंट (JKLF) ने उघडपणे मान्य केले होते, की तीन हजाराहून जास्त अतिरेकी तिकडे प्रशिक्षण घेत आहेत.

इस्लामी मूलतत्त्ववादी संघटनांना पाक लष्कर आणि आय एस आय (ISI) ह्या मदत करतात, त्यांच्याबद्दल सक्रीय सहानुभूती बाळगतात, हे उघड आहे. अनेक काश्मिरी दहशतवादी गटांचे मुख्यालय पाक व्याप्त काश्मीरमध्ये आहे.

२६ नोव्हेंबरच्या मुंबई ताज हॉटेल हल्ल्याचा सूत्रधार हाफिज मोहम्मद सयीद हा `लष्कर ए तैबा` चा संस्थापक. त्याच्यावर अमेरिकेने १० दशलक्ष डॉलर्स एव्हढ्या मोठ्या रकमेचे बक्षीस लावलेले असून, हाफिज सध्या `जमात उद दावा` (JuD) या संघटनेचे नेतृत्व करतो. केवळ नाव बदलून चालवलेली `लष्करे तैबा` ची शाखा असे तिचे वर्णन करता येईल. भारतीय संसदेवर २००२ मध्ये झालेल्या हल्ल्यात `लष्करे तैबा` चा हात असल्याच्या मुद्द्यावरून पाकिस्तान सरकारला तिच्यावर बंदी घालावी लागली होती. त्यातून मार्ग काढण्यासाठी केलेला नावात बदल – म्हणजे `लष्करे तैबा` चे `जमात उद दावा` मध्ये रुपांतर. `जमात उद दावा` ही सुद्धा आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना म्हणून भारत, रशिया, युरोपीय संघ आणि अमेरिका या देशांत प्रतिबंधित आहे. जमात उद दावा काश्मीरमध्ये जिहाद चे खुलेआम समर्थन करते, त्यासाठी जाहीर सभा, – अशी एक सभा मिनार ए पाकिस्तान या राष्ट्रीय स्मारकाजवळ आयोजित केली होती – तसेच काश्मीर मधील जिहादला आर्थिक पाठबळ देण्यासाठी देणग्या गोळा करते.

हे ही वाचा:

पित्याच्या नात्याला काळीमा; पोटच्या मुलीवर अत्याचार!

१०० वर्षे जुनी मूर्ती चोरणाऱ्या चोराला झाला पश्चात्ताप, मूर्ती परत करताना मागितली माफी!

अमितभाई कल किसने देखा? आताच निर्णय घ्या…

अनाथ मुलींना पुरस्कार न देताच झाकीर नाईक निघून गेला!

५ एप्रिल २००६ रोजी पोलिसांनी सहा इस्लामी मूलतत्त्ववादी अतिरेक्यांना, ज्यात एक धर्मगुरूही होता, त्याला अटक केली; ह्या अतिरेक्यांनी वाराणसी मध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्यात मदत केली होती. ह्यातील धर्मगुरू हा दक्षिण आशियाई प्रतिबंधित दहशतवादी गट – हरकत उल जिहाद अल इस्लामी – याचा कमांडर होता. ह्या गटाचा आय एस आय शी संबंध आहे. जुलै २०१० मध्ये पाकिस्तानचे अध्यक्ष असिफ अली जरदारी यांनी ही गोष्ट मान्य केली, की आधीच्या पाक सरकारांनी अतिरेक्यांना प्रेरित करणे, त्यांना प्रशिक्षण देणे, या गोष्टी काही तात्कालिक हेतू साध्य करण्यासाठी केल्या होत्या. असे अतिरेकी हे ११ सप्टेंबर च्या अमेरिकेवर झालेल्या हल्ल्यापूर्वी हीरो (नायक) मानले जात, हेही त्यांनी कबूल केले.

ऑक्टोबर २०१० मध्ये पाकिस्तानचे अध्यक्ष व लष्कर प्रमुख जनरल परवेझ मुशर्रफ यांनी हे मान्य केले, की पाक लष्कराने, काश्मीरमध्ये भारतीय लष्कराशी लढण्यासाठी अतिरेक्यांना प्रशिक्षित केले. पाकिस्तान सतत दहशतवादाचा पुरस्कार करत असल्याचे सिद्ध करण्यासाठी आपल्या परराष्ट्र खात्याने या गोष्टी अनेकदा युनोच्या आमसभेत मांडल्या आहेत. युनो ने दहशतवादी म्हणून प्रतिबंधित केलेल्या संघटना पाकिस्तानात वेगळ्या नावाने अजूनही कार्यरत आहेत.

आता आपण दि ११ सप्टेंबर २००१ नंतर भारतात झालेल्या अशा मोठ्या इस्लामी मूलतत्त्ववादी अतिरेकी हल्ल्यांचा तपशील बघू, जे पाकिस्तान स्थित गटांनी घडवून आणले, व ज्यांत भारताचे जवान, सुरक्षाकर्मी ठार केले गेले.
१७ सप्टेंबर २००१ पासून २६ जून २००४ पर्यंत च्या साधारण तीन वर्षांत सुमारे ४७ हल्ले झाले. यामध्ये बहुतांश हल्ले जम्मू काश्मीरच्या वेगवेगळ्या भागात असले, तरी काही हल्ले, दिल्ली, कोलकाता व इतरत्र ही झाले आहेत. या हल्ल्यांत १३५ सुरक्षाकर्मी ठार करण्यात आले असून अनेक जखमी आहेत. या हल्ल्यांशी संबंधित पाकिस्तानातील दहशतवादी गट प्रामुख्याने आय एस आय, अल कायदा हे आहेत. वापरली गेलेली हत्यारे ए के सिरीजमधील रायफल्स, ग्रेनेड्स, आय इ डी (Improvised Explosive Device) तसेच काही ठिकाणी बॉम्ब्स सुद्धा आहेत. ही माहिती दक्षिण आशियाई टेररीझम पोर्टल वर उपलब्ध आहे.

अलीकडेच युनोच्या आमसभेत पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी काश्मीर आणि अनुच्छेद ३७० चा मुद्दा उपस्थित केला. त्यावर भारताच्या संयुक्त राष्ट्रातील स्थायी मिशनच्या प्रथम सरचिटणीस भाविका मंगलानंदन यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले. भारतात केल्या जाणाऱ्या सीमापार दहशतवादाचे परिणाम भोगावे लागतील, हे पाकिस्तानने समजून घ्यावे, इतक्या स्पष्ट शब्दात पाकिस्तानी पंतप्रधानांना सुनावले गेले. शरीफ यांनी काश्मीरचा मुद्दा उपस्थित करताना अनुच्छेद ३७० पुन्हा लागू करावे आणि शांततेसाठी चर्चा सुरु करावी, असे म्हटले होते.

युनो मध्ये राजनैतिक पातळीवर सडेतोड उत्तर देणे, वगैरे ठीकच आहे. पण प्रश्न आहे, तो संरक्षण आणि सार्वभौमतेचा. आपल्या देशावर गेली अनेक वर्षे छुपे दहशतवादी हल्ले करून, अतिरेकी शेजारच्या देशात उघडपणे आश्रय घेतात व तिथे सुखाने वर्षानुवर्षे राहतात, हे अत्यंत लांच्छनास्पद आहे. गुन्हेगारांच्या प्रत्यार्पणासाठी कैक वेळा ठोस पुराव्यासह केलेल्या विनंत्यांची दखल घेतली जात नाही. आज इस्राएल गाझापट्टी आणि लेबनॉन मधून शत्रूंच्या दहशतवादी संघटनांचे म्होरके टिपून मारत आहे. यापूर्वीही त्या देशाने नाझी जर्मनीतील युद्ध गुन्हेगार जगभरात जिथे जिथे लपले होते, तिथून शोधून काढून यमसदनास पाठवले होते.

अलीकडे पुलवामा हल्ल्याचा बालाकोट सर्जिकल स्ट्राईक च्या रूपाने आपण घेतलेला प्रतिशोध आपल्या “घरमे घुसकर मारेंगे…” या नव्या धोरणाचेच प्रतीक आहे. आज आपल्याला इस्राएलचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून, असेच तेजस्वी प्रतिहल्ले करण्याची नितांत गरज आहे. इंग्रजीत म्हण आहे – “Aggression is best defence” अर्थात “आक्रमण हेच उत्तम संरक्षण” होय. पाकिस्तानात आश्रयाला गेलेल्या आपल्या फरार गुन्हेगारांच्या याद्या, इथल्या दहशतवादी हल्ल्यांत सक्रीय सहभाग असल्याचे किंवा सूत्रसंचालन केल्याचे पुरावे, प्रत्यार्पणाच्या विनंत्या वगैरे सगळे रीतसर करून झाले आहे.

आता इस्राएलप्रमाणे आपण आपल्या देशाच्या गुन्हेगारांना त्यांच्या राहत्या घरी – ज्या कुठल्या बिळात ते लपले असतील, तिथे जाऊन – त्यांना योग्य ती शिक्षा करण्याचा आपला अधिकार बजावला पाहिजे. २९३ निरपराध नागरिकांचे नाहक बळी घेणारा दाऊद जर त्याच्या कराचीतील अलिशान हवेलीत उडवला गेला, तर इथल्या त्याच्या छुप्या चाहत्यांना जबरदस्त धक्का बसेल. इथे – वक्फला हात लावू नका, समान नागरी कायदा नको, सी ए ए नको, हलाला, हिजाब, बुरखा चालूच ठेवू, आमच्या धार्मिक बाबींत ढवळाढवळ नको, बहुपत्नीत्व तसेच ठेवा, बालविवाह तसेच ठेवा, …..थोडक्यात आम्हाला शरीयतचा कायदाच हवा असे म्हणणारे सगळे आतून हादरतील. तिकडून त्यांची पाठराखण करणारे , त्यांना सक्रीय सहानुभूती , आधार देणारे त्यांचे Godfather – दत्तक बाप जेव्हा शिल्लक राहणार नाहीत, तेव्हा त्यांचे मनोधैर्य निश्चितच खचेल. हे आवश्यक आहे. (एका जाहिरातीत म्हटल्याप्रमाणे – ये डर अच्छा है.)
इतकी वर्षे कॉंग्रेसच्या तुष्टीकरण नीतीमुळे जे झाले, ते झाले. आता वेळ आली आहे, ते संपवण्याची. परिणामकारकरीत्या, कायमचे संपवण्याची. गेल्या एव्हढ्या वर्षांतील दहशतवादी हल्ल्यांतील फरार गुन्हेगारांची यादी गृह / संरक्षण विभागातील योग्य त्या टेबलावर असावी. दररोज त्यातील एकेका – किंवा जास्तही – क्रूरकर्म्याची नावे त्यातून `डिलीट` केली जावीत. ती सगळी यादी संपेल, तेव्हा आपण ताठ मानेने जगाला छातीठोकपणे सांगू की हो, आम्ही आमच्या गुन्हेगारांना योग्य ती शिक्षा दिली. ह्या देशाचा गुन्हेगार, मग तो पाताळात जरी लपला, तरी आम्ही त्याला हुडकून काढून मारू. आपले परराष्ट्र मंत्री एस जयशंकर ही अलीकडेच म्हणालेत, पाकला त्याच्या कर्माची फळे भोगावीच लागतील. पाचशे वर्षांनी अयोध्येत सन्मानपूर्वक विराजित प्रभू श्रीराम हे घडवून आणण्याची शक्ती निश्चितच देईल. आजवर जगाने भारताची सहिष्णुताच पाहिली आहे. आता जगाला भारताची विजीगिषु वृत्ती, पराक्रम ही दिसू दे. ज्यांनी छुप्या, भ्याड, अन्याय्य रीतीने आमच्या निष्पाप लोकांना मारले, त्यांना त्याची किंमत मोजावी लागलीच पाहिजे. “जी हां …. घरमे
घुसकर मारेंगे !”

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
180,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा